Fatty liver Ayurvedic treatment saam tv
लाईफस्टाईल

Fatty Liver Remedy: कोणत्याही औषधांशिवाय मुळासकट निघून जाईल Fatty Liver ची समस्या; फक्त हे आयुर्वेदिक उपचार करा

Fatty liver Ayurvedic treatment: फॅटी लिव्हर ही एक सामान्य आरोग्य समस्या बनली आहे, जिथे यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होते. वेळेवर यावर लक्ष न दिल्यास यकृताचे गंभीर नुकसान होऊ शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फॅटी लिव्हरची समस्या आजकाल फार सामान्य झाली आहे. मुळात फॅटी लिव्हर ही दोन पद्धतीचे आजार असतात. यावेळी एका समस्येत जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायल्याने हा त्रास होतो. याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असं म्हणतात. तर दुसरं चुकीचा आहार आणि जीवनशैलीमुळे होतो ज्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग म्हणतात.

मुख्य म्हणजे जर या आजाराची वेळीच काळजी घेतली नाही तर त्यामुळे लिव्हर सिरोसिस होण्याचा धोका सुरुवात करतात, ज्यामुळे यकृताचं कार्य पूर्णपणे थांबू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर तो कोणत्याही औषधाशिवाय पूर्णपणे बरा होऊ शकतो.

प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यांच्या त्यांच्या या व्हिडीओमध्ये ३ मार्ग सांगितले आहेत. हे उपाय केल्यामुळे फक्त ३ महिन्यांत फॅटी लिव्हर रिव्हर्स होऊ शकतो. हे उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.

फॅटी लिव्हरला रिव्हर्स करण्यासाठी करा हे उपाय

तुमचं डाएट चांगलं ठेवा

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, यकृत बरं करण्यासाठी, सर्वात आधी तुमचा आहार सुधारला पाहिजे. जर तुम्ही साखर, रिफाइंड पीठ, तळलेले अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न यापासून दूर राहिलात तर यकृत स्वतःच बरं होऊ लागतं.

काय खाल्लं पाहिजे?

जर तुम्हाला फॅटी लिव्हर असेल तर डॉक्टर झैदी सकाळी रिकाम्या पोटी भोपळा किंवा बीटचा रस पिण्याचा सल्ला देतात. यावेळी दुपारी मूग डाळ, दलिया आणि भरपूर हिरव्या भाज्या खा. या सर्वांव्यतिरिक्त, दिवसभर भरपूर पाणी प्या आणि हलके अन्न खा, जेणेकरून यकृतावर कोणताही भार पडणार नाही.

शारीरिकदृष्या फीट राहा

यकृत हा एक डिटॉक्सिफायिंग अवयव आहे. म्हणजेच तो शरीरातील टॉक्सिक पदार्थ काढून टाकतो. परंतु ज्यावेळी तुम्ही शारीरिक हालचाल कमी करता तेव्हा ही प्रक्रिया मंदावण्यास सुरु होते.

काय केलं पाहिजे?

डॉ. झैदी यांनी दररोज किमान ३०-४५ मिनिटं चालण्याची शिफारस केली आहे. यामध्ये तुम्ही तुम्ही योग करू शकता, विशेषतः नौकासन आणि पवनमुक्तासन. सर्वांव्यतिरिक्त, पोटाची हलकी मालिश करा. हे सर्व यकृत एक्टिव्ह ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

नैसर्गिक औषधी वनस्पतींनी यकृतांची मजबूती

आयुर्वेदात अशी अनेक औषधं आहेत जी यकृताची चरबी वितळवण्यासाठी प्रभावी मानली जातात. अशामध्ये डॉ. झैदी यांनी रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळ्याची पावडर खाण्याची शिफारस करतात. सकाळी उठल्यानंतर भूमी आवळा किंवा कलमेघ चहा प्या. डॉक्टरांनी सांगितलंय की, या दोन्ही औषधी वनस्पती यकृताची सूज आणि चरबी कमी करण्यासाठी ओळखल्या जातात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

SCROLL FOR NEXT