Fatty Liver Disease saam tv
लाईफस्टाईल

Fatty Liver Disease: देशातील 38% लोक फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त, शरीरात दिसणारी ही 5 लक्षणं ओळखा

Early Signs of Fatty Liver: फॅटी लिव्हरची सुरुवातीची 5 महत्त्वाची लक्षणं काय आहेत ते पाहूयात. पोटाभोवती चरबी वाढणे, सतत थकवा, अपचन, त्वचेतील बदल आणि पोटदुखी यांसारख्या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास लिव्हरचे गंभीर नुकसान होऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल बदलती जीवनशैली, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास झपाट्याने वाढताना दिसतोय. केवळ दारू पिणाऱ्यांनाच नाही तर सामान्य लोकांनाही या आजाराचा धोका निर्माण होत आहे. अलीकडील अभ्यासानुसार, देशातील सुमारे 38 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त आहेत.

महत्त्वाचं म्हणजे अनेकांना या आजाराची सुरुवातीची लक्षणं समजून येत नाहीत. त्यामुळे उपचार होण्यास उशीर होऊन लिव्हरचं कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता वाढते. वेळेत उपचार न झाल्यास पुढे जाऊन सिरोसिससारख्या गंभीर आजारही होण्याचा धोका असतो

फॅटी लिव्हर म्हणजे काय?

लिव्हर हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. शरीरासाठी आवश्यक ऊर्जा मिळावी यासाठी चरबी साठवणं, विषारी पदार्थ बाहेर टाकणं तसंच पचनक्रियेत मदत करणं ही त्याची महत्त्वाची कामं आहेत. मात्र लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण एकूण वजनाच्या 5 ते 10 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास त्याला फॅटी लिव्हर डिसीज म्हटलं जातं. या स्थितीत लिव्हरमध्ये चरबी साचते.

फॅटी लिव्हरचे प्रकार

फॅटी लिव्हरचे मुख्यतः दोन प्रकार मानले जातात.

अल्कोहोलिक फॅटी लिव्हर

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लिव्हरमध्ये चरबी साचू लागते. दीर्घकाळ मद्यसेवन केल्यास हा प्रकार उद्भवू शकतो.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर

हा प्रकार मद्यपानाशी संबंधित नसतो. जास्त चरबीयुक्त आहार, मधुमेहासारखे चयापचयाशी संबंधित विकार आणि बैठी जीवनशैली यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते.

फॅटी लिव्हरची सुरुवातीची 5 लक्षणं

पोटाभोवती वाढणारी चरबी

हेल्दी आहार घेत असूनही वजन वाढत असेल किंवा विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होत असेल तर ते फॅटी लिव्हरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

सतत जाणवणारा थकवा

पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही दिवसभर थकवा जाणवत असेल तर लिव्हर शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर टाकण्याचं काम व्यवस्थित करत नसल्याचे संकेत असू शकतात.

पचनाशी संबंधित तक्रारी

तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर मळमळ होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा वारंवार अपचनाचा त्रास होणं याकडे दुर्लक्ष करू नये. ही लिव्हरच्या समस्येची सुरुवात असू शकते.

त्वचेतील बदल

मान किंवा बगल भागात त्वचा काळवंडणं, त्वचेला खाज येणं किंवा त्वचेवर किंचित पिवळसरपणा दिसणं ही देखील लिव्हरशी संबंधित समस्येची लक्षणं असू शकतात.

पोटाच्या वरच्या भागात वेदना

उजव्या बाजूच्या वरच्या पोटात जडपणा जाणवणं हे लिव्हरमध्ये चरबी साचणं किंवा सूज येण्याचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात

लोणावळा-खंडाळापेक्षा पावसाळ्यात 'या' ठिकाणी होते पर्यटकांची तुफान गर्दी; तुम्हाला माहितीये का हे ठिकाण?

Pune : पुण्यात मोठी दुर्घटना, एकाच दिवशी तिघांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT