Simple Fashion Tips, Fashion Tips For Mens, Travel Fashion Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Fashion Tips For Mens : प्रवास करताना पुरुषांसाठी ठरतील हे आउटफिट्स आरामदायी, एक नजर टाका फॅशनवर

प्रवासादरम्यान फॅशन करायची आहे तर या कपड्यांची चॉईस करा

कोमल दामुद्रे

Fashion Tips For Mens : पुरुषांच्या कपड्यांबद्दल अनेक निवडी असल्या तरी ते तसे फॅशन कमी करतात. त्याच्या कपाटात सामान्यत: जीन्स व टी- शर्ट शिवाय आपल्याला काही मिळत नाही. प्रवास करताना आपल्याला तो आरामदायी हवा असतो. त्यात आपल्याला कोणतीही अडचण नको असते.

टी-शर्ट हे प्रवासातील सर्वोत्तम आरामदायी कपडे मानले जातात. तसेच ते आपल्या बॅगमध्ये सहज बसणारे व स्टायलिश दिसणारे कपडे आहेत.

प्रवास (Travel) हा कंटाळवाण्या दिवसापासून आपल्याला ब्रेक मिळावा म्हणून आपण करत असतो. ज्यामुळे आपल्याला त्यातून आराम मिळतो. फिरायला गेल्यानंतर समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारणे किंवा नवीन शहर एक्सप्लोर करणे असो, छान दिसणे आणि आरामदायी राहणे हे सहज प्रवास अनुभवासाठी आवश्यक आहे. परंतु, आज आपण असे काही कपडे पाहणार आहोत जे आपल्याला प्रवासात आरामदायी वाटतील व आपला प्रवास सुखकर करतील. (Fashion Tips For Men's)

हे देखील पहा -

1. बेसिक रॉ एज टीज -

बेसिक रॉ एज टीज ​आपल्यासारख्या चपखल लोकांसाठी एक प्रीमियम आणि स्वच्छ लुक देऊ शकतात. ते खरेदी करताना आपण पोत, लाइक्रा आणि रंगांच्या बँडसह आपण खरेदी करु शकतात. लाइक्राने बनवलेले कपडे आपला प्रवास आरामदायी बनवू शकतात त्यासाठी प्रवासात आपण या कपड्याचे परिधान करायला हवे.

2. सॉलिड टी-शर्ट -

आपल्याला नेहमीच्या सॉलिड टी-शर्टचा कंटाळा आला असेल तर आपण पॉपकॉर्न कॅज्युअल टीजची निवड करु शकतो. त्यात असणाऱ्या गळ्याची प्रिमियम रचना आपल्याला प्रवासासाठीच सोपीस्कर नाही तर संध्याकाळच्या पार्टीसाठी देखील आरामदायी बनू शकते.पॉपकॉर्नच्या टेक्सचरमुळे त्याला स्टायलिश लुक मिळतो आणि हेरिंगबोन नेकमुळे नवा लुक आपल्याला मिळू शकतो. (Best Men's Style Tips)

3. ऑल-राउंड मेरिनो वूल टीज-

विविध कार्यक्रम किंवा प्रसंगांसाठी ऑल-राउंड मेरिनो वूल टीज सोबर असतात. हे टी मेरिनो वूल आणि नायलॉनच्या कॉम्बोने बनवली असून ते अतिशय आरामदायक असतात. ते आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात मदत करतात आणि आपली त्वचा संरक्षित ठेवण्यासाठी अँटी-मायक्रोबियल आहेत. प्रवासात आपल्याला घाम व इतर गोष्टींपासून ते लांब ठेवू शकतात. हे टीज स्पर्शाला मऊ, टिकाऊ आणि तरतरीत आहेत.

4. क्विक-ड्राय टीज-

​​प्रवासात आपल्याला सतत घाम येतो त्यामुळे आपल्याला प्रवास करण्याचा अधिक वैताग येतो अशावेळी आपण क्विक-ड्राय टीजची चॉईस करु शकतो. ज्यामुळे आपल्याला घाम येणार नाही व आपली त्वचा कोरडी राहील. हे टीज त्यांच्या मऊ आणि आरामदायी असतात व प्रवासात यांना उत्तम पर्याय मानले जाते. आपल्या ट्रॅव्हल बॅगमध्ये क्विक ड्राय टी नेहमी असायला हवी.

5. क्लासिक पोलो -

कॉलरसह क्लासिक पोलो नेहमीच आपल्या फॅशन (Fashion) शैलीत छान दिसतात. नायलॉन, लोकर इत्यादी वेगवेगळ्या सामग्रीपासून बनवलेल्या या टीज स्टायलिश आणि घालण्यास अगदी सोप्या आहेत. जे आपल्याला खूप आरामदायी ठेवतात. हे धुण्यास सोपे, चांगले फिटिंग आणि फॅशनेबल आहेत. आपल्या ट्रॅव्हल बॅगमध्ये पोलो ठेवल्याने विमानतळ, रेस्टॉरंट, संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये चांगले दिसण्यास मदत होईल आणि आपला फॅशेन्स लूक वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुणे शहरातील तापमानात वाढ, हवेतील गारवा झाला कमी

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT