Monsoon Fashion Tips : पावसाळ्यात कोणत्या कपड्यांचा सर्वाधिक ट्रेंड असतो ? या ऋतूत कोणते कपडे घालणे टाळावे ? जाणून घ्या

पावसाळ्यात अशी करा फॅशन आणि जपा ट्रेंड
Fashion, Monsoon Fashion tips
Fashion, Monsoon Fashion tipsSaam Tv
Published On

Monsoon Fashion Tips : आपल्यापैकी बहुतेकांना पावसाळा आवडतो. एप्रिल व मेच्या उष्णतेपासून आपल्याला विश्रांती मिळते. या ऋतूमध्ये आपल्याला फिरण्याचा व नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असतो.

हे देखील पहा -

पावसाळा हा ऋतू कितीही अल्हादायक असला तरी फॅशनप्रेमींसाठी हा कंटाळवाना असतो. सततच्या पावसामुळे आपले कपडे भिजतात त्यामुळे आपण केलेली फॅशन (Fashion) काही फारशी आपल्याला तेव्हा शोभत नाही. अशावेळी आपण कोणते कपडे परिधान करायला हवे व कोणते टाळायला हवे हे जाणून घेऊया.

१. पावसाळ्यात (Monsoon) आपल्या अंगावर सतत पाणी व चिखल उडत असतो. त्यामुळे आपण वैतागतो यात आपले कपडेही खराब होतात अशावेळी आपण गुडघ्यापर्यंत कपडे घालायला हवे. यात आपण फिट केलेले मिडी कपडे, स्केटर स्कर्ट किंवा उच्च-कंबर असलेल्या शॉर्ट्सचा विचार करु शकतो. जर पँट घालायची असेल तर क्रॉप केलेली पॅंट निवडणे चांगले असेल.

Fashion, Monsoon Fashion tips
High blood pressure : उच्च रक्तदाबासाठी हा योग ठरेल रामबाण, नैसर्गिकरित्या राहिल उच्च रक्तदाब नियंत्रणात

२. आपल्याला पारंपारिक लूकचे कपडे घालायचे असतील तर पावसाळ्यात सलवार व पटियाला घालणे टाळा. त्याऐवजी आपण लेगिंग्ज किंवा चुरीदारांसह लहान कुर्तीची निवड करु शकतो. यात आपण लांब दुपट्टे, स्कार्फ किंवा स्टोलचा वापर करु शकतो.

३. पावसाळ्यात श्रग्स देखील घालू शकतो. अशावेळी आपण पांढरे आणि हलक्या रंगाचे टी-शर्ट घालू शकतो. आकर्षक पॅटर्नच्या श्रग्सवर लेयरिंग करून, आपण त्यावर कोणताही शर्ट घालू शकतो. या ऋतूमध्ये किमोनो आणि काफ्तान श्रग्स चांगले दिसतात.

४. पावसाळ्यात जीन्स लवकर सुकत नाही त्यासाठी आपण पर्याय म्हणून पलाझो किंवा कोणत्याही रुंद-हेम्ड बॉटम्स घालू शकतो. योग्य पोशाखाबरोबरच पावसात सुरक्षित आणि आरामदायी शूज घालावेत. कोणत्याही बंद शूजप्रमाणे स्टिलेटोस आणि टाच न दिसणारे शूज घाला. यामध्ये मखमली किंवा लेदर शूज घालणे चांगले नाही.

५. सोल्ड आणि चमकदार रंगाचे फ्लिप-फ्लॉप देखील पावसाळ्यासाठी योग्य पर्याय आहेत. आपले पाय बॅक्टेरियापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना कोरडे ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ मोजे घाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com