Famous Waterfall Near Mumbai Saam Tv
लाईफस्टाईल

Famous Waterfall Near Mumbai : हिरवा निसर्ग हा भोवतीने..., वीकेंडला भेट द्या मुंबईतील या मनमोहक धबधब्यांना

Weekend Travel Tour : या ऋतूमध्ये ट्रेकिंग, पाऊस, धबधबे पाहण्याची मज्जा काही औरच !

कोमल दामुद्रे

Best Waterfall In Mumbai: वीकेंड आणि पाऊस हा हल्ली प्रत्येकाचा सोबती जणू. पावसाळा म्हटलं की, अनेकांना ओढ लागते ती निसर्गसौंदर्याची. या ऋतूमध्ये ट्रेकिंग, पाऊस, धबधबे पाहण्याची मज्जा काही औरच !

वीकेंडच्या दिवशी अनेकांचा फिरायला जायचा प्लान असतो. पण कमी वेळेत कमी खर्चात नेमके जायचे कुठे हा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल. असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला मुंबई व नवी मुंबई लगत असणाऱ्या मनमोहक धबधब्यांबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया त्याबद्दल

1. पांडवकडा धबधबा, नवी मुंबई (Pandavkada Falls)

पांडवकडा (Pandavkada Falls) धबधबा हा मुंबईच्या सर्वात जवळच्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा नवी मुंबई येथील पांडवकडा डोंगर रांगाच्या मधोमध आहे. या ठिकाणचे सौंदर्य मुंबईकरांना आकर्षित करते.त्यामुळे पावसाळ्यात येथे पर्यटकांची वर्दळ असते. येथे भेट देण्यासाठी जवळच काही बौद्ध लेणी देखील आहेत. जिथे तुम्ही फिरूही शकता.

2. माळशेज घाट- ठाणे जिल्हा (Malshej Ghat)

माळशेज घाट हा गिर्यारोहक आणि निसर्ग प्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. या घाटावरुन मनमोहक असा धबधबा वाहतो जिथून तुम्हाला निसर्गाचे सुंदर असे दृश्य पाहायला मिळते. जर तुम्हा मनमोहक दृश्य पाहायचे असेल तर तुम्ही या ठिकाणाला (Place) नक्कीच भेट देऊ शकतात.

3. चिंचोटी धबधबा - तुंगारेश्वर (Chinchoti Waterfall)

चिंचोटी धबधबा हा वसई तालुक्यातील तुंगारेश्वर या ठिकाणी आहे. 100 फूट उंचीवरून घनदाट जंगलाच्या मधोमध पडतो. या धबधब्यावर जाण्यासाठी तुम्हाला कामण गावात जावे लागते. घनदाट जंगलात वसलेल्या या धबधब्याचा आनंद घेताना पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. फोटोग्राफीप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा सुंदर आहे.

4. भिवपुरी धबधबा - कर्जत (Bhivpuri Waterfall)

भिवपुरी हा धबधबा कर्जत येथे आहे. मुंबईच्या गजबजाटापासून शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही भिवपुरी धबधब्याला भेट देऊ शकता. हे ठिकाणी मित्रांसह वीकेंड (Weekend) गेटवेसाठी योग्य आहे. जर तुम्हाला निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT