Family Planning Counselling Saam Tv
लाईफस्टाईल

Family Planning Counselling : बाळासाठी प्रयत्न करताना जोडीदाराला हवा मानसिक आधार, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Advice on conceiving and preparing for pregnancy : प्रत्येक व्यक्तीला पालकत्व कधी स्वीकारावं याचा अधिकार व स्वातंत्र्य असायला हवं. यासाठी घरच्यांनी व समाजाने त्यांना योग्य सहकार्य करायला हवं. हे सर्व करत असताना त्यांनी योग्य असा वैद्यकीय सल्ला घ्यावा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Taking Care of Your Mental Health During Pregnancy:

ज्या स्त्रिया काही कारणाने व्यंधत्वाचा सामना करत आहे , अशा स्त्रीला आपल्या समाजात अनेक त्रासाला सामोर जाव लागतं. त्याचबरोबर प्रत्येक मासिक पाळी बरोबर येणारं दडपण मानसिक ताण आणखी वाढवत असतं , या वेळी पती पत्नी मध्ये उत्तम समन्वय असणं खूप गरजेचं आहे. या ताणामुळे काही स्त्रिया या नैराश्याने ग्रासल्या जातात.

पुण्यातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी हॉस्पिटलच्या वंधत्व निवारण तज्ञ डॉ. करिश्मा डाफळे म्हणतात प्रत्येक व्यक्तीला पालकत्व कधी स्वीकारावं याचा अधिकार व स्वातंत्र्य असायला हवं. यासाठी घरच्यांनी व समाजाने त्यांना योग्य सहकार्य करायला हवं. हे सर्व करत असताना त्यांनी योग्य असा वैद्यकीय सल्ला घ्यावा. याला गर्भधारणेपुर्व समुपदेशन असे म्हणतात. आई होण्याची योग्य वेळ कोणती हे ठरवताना एक गोष्ट महत्वाची ठरते ते म्हणजे ओव्हेरियन रिझर्व्ह किंवा अंडकोषातील स्त्रीबीजांची संख्या सामान्यतः पस्तीशीनंतर ही संख्या व त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जोडीदारासोबत (Parents) तुमच्या भावना, भीती आणि अपेक्षांबद्दल खुलेपणाने चर्चा करा. तुमच्या जोडीदाराच्या विचारांचा आदर करा. प्रत्येक चांगल्या वाईट वेळांमध्ये तुम्ही एकमेकांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. या प्रवासात तुम्ही दोघांना वेगवेगळ्या भावनांचा अनुभव येऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्वत: च्या मार्गाने सामना करते, म्हणून आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

एकमेकांना आधार कसा द्याल?

1. स्वतःला साक्षर करा:

गर्भधारणा (Pregnancy), बाळंतपण आणि तुमच्या जोडीदाराच्या शरीरात होत असलेल्या बदलांबद्दल जाणून घेण्यासाठी वेळ काढा. काय अपेक्षित आहे हे समजून घेणे तुम्हाला अधिक चांगले समर्थन प्रदान करण्यात मदत करू शकते.

2. शारीरीक व मानसिक आधार द्या :

शारीरिक आणि भावनिकरित्या उपस्थित राहून तुमचा पाठिंबा दर्शवा. तपासणी , अल्ट्रासाऊंड स्कॅनिंगला एकत्र जा. ज्यामुळे एकमेकांना आधार वाटेल आणि तणाव (Stress) दूर करता येईल.

3. कामात मदत करा:

घरातील कामे, स्वयंपाक आणि इतर कामात मदत करा. ज्यामुळे शारीरिक आणि भावनिक ओझे कमी करण्यात मदत होऊ शकते.

4. एकमेकांना समजून घ्या:

हार्मोनल बदलांमुळे गर्भधारणेत मूड स्विंग्ज, चिंता किंवा थकवा या समस्या जाणवू शकतात. अशावेळी चिडचिड न करता एकमेकांना समजून घ्या.

5. एकमेकांची काळजी घ्या :

शारीरीक समस्यांना सामोरे जाताना एकमेकांची काळजी घ्यायला विसरु नकां वेळोवेळी औषध घेणे, व्यायाम करणे, आनंदी राहणे या माध्यमातून एकमेकांची काळजी घ्या.

6. नाते आणखी मजबूत करा

रोमँटिक डिनर, मुव्हीजला जाणे किंवा बीचवर फेरफटका मारणे, छोट्या सहलीला जाणे. एकत्र वेळ घालवा.

7. आनंदी रहा

एकत्र छंद जोपासा, ज्या गोष्टींमध्ये दोघांनीही आनंद मिळतो अशा गोष्टी करा जसे की बागकाम, चित्रकला, वाद्य वाजविणे, गाणे म्हणणे, सायकलींग करणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT