Funeral Procession Saam TV
लाईफस्टाईल

Funeral Procession : अंत्ययात्रेला जाऊन आल्यानंतर अंघोळ का केली जाते ? जाणून घ्या, धार्मिक व वैज्ञानिक कारण

अंत्य संस्कारानंतर अंघोळ करण्याचे धार्मिक कारण काय ?

कोमल दामुद्रे

Funeral Procession : या पृथ्वी तलावर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा अटळ आहे. मनुष्य जीव जन्माला आल्यापासून ते त्याचा मृत्यू होईपर्यंत अनेक विधी केल्या जातात. आपल्या धार्मिक कार्यानुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू (Death) झाल्यानंतर त्याचा विधीवत अंत्यसंस्कार केला जातो. सगळ्या विधी झाल्यानंतर व अग्नीदान केल्यानंतर अत्यंत यात्रेला गेलेला प्रत्येक व्यक्ती हा अंघोळ करतो पण, अंघोळ का केली जाते याचे सत्य कुणालाच माहित नाही. (Latest Marathi News)

आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत ज्यांना अंत्य यात्रेतून आल्यानंतर अंघोळ का केली जाते हे देखील माहित नसते. तुम्हीही त्यापैकी एक आहात का ? ज्यांना स्मशानातून आल्यावर आंघोळ का करतात हे माहिती नाहीये. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काय आहे नेमकं कारण. अंत्य संस्कार केल्यानंतर आंघोळ करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणही आहे.

अंत्य संस्कारानंतर अंघोळ करण्याचे धार्मिक कारण काय ?

स्मशानभूमीतून आल्यानंतर अंघोळ करण्याचे धार्मिक कारण हे असे आहे की, स्मशानभूमी ही अशी जागा आहे जिथे नकारात्मकता (Negative) जास्त असते. ज्याचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. या शक्ती बळकट असल्याने त्या आपल्या पाठलाग करतात व आपला मागोवा घेत येतात. असे म्हटले जाते की, अंत्य यात्रा संपल्यानंतर आत्मा काही काळ तिथेच असतो जो कुणावरही आपली नैतिक ऊर्जा प्रभावित करु शकतो.

वैज्ञानिक कारण

अत्यं संस्कारानंतर अंघोळ करण्याचे कारण असे की, मृतदेह हा बराचकाळ बाहेर असतो. बाहेरील वातावरणातील सुक्ष्मजीव आपल्या तोंडावाटे किंवा हातावाटे आपल्या शरीराच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. आपण एखाद्या मृत व्यक्तीच्या जवळ गेलो तर अंघोळ करणे गरजेचे आहे. यामुळे विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करणार नाही व तुम्ही आजारी देखील पडणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत बैठक, नेमकी काय झाली चर्चा?

Weight Loss Drink Recipe : रिकाम्या पोटी प्या एक ग्लास 'हे' ड्रिंक, १५ दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल फिट

Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा

Latur Police: लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक, ACB ची मोठी कारवाई; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT