A viral claim about carrying onions for heat protection spreads online, but experts advise proven methods instead. saam tv
लाईफस्टाईल

खिशात कांदा ठेवल्याने उष्माघातापासून सुटका? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Jyotiraditya Scindia Viral Claim on Onion: व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो.

Sandeep Chavan

  • कांदा खिशात ठेवण्याचा दावा वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा

  • सोशल मीडियावर अफवा वेगाने पसरत आहेत

  • उष्माघात टाळण्यासाठी योग्य उपाय आवश्यक

आता दावा करण्यात आलाय की कांदा खिशात ठेवला तर उष्माघाताचा त्रास होत नाही. मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीच हा दावा केलाय.पण, खरंच कांद्यामुळे गरमीपासून सुरक्षा मिळते का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात. हा व्हिडिओ पाहिलात.चक्क केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीच हा दावा केलाय.

सिंधिया यांनी उन्हाळ्याच्या तीव्र दिवसात खिशात कांदा ठेवून उकाड्यावर मात कसं करायचं हे सांगितलंय.फक्त खिशात एक कांदा ठेवतो.तुमच्या खिशात एक कांदा ठेवा, 51 डिग्री उष्णतेतही काही होणार नाही, असा दावा त्यांनी केलाय.पण, खरंच कांद्यामुळे उष्माघाताचा त्रास होत नाही का.? उन्हात फिरताना कांदा खिशात ठेवल्याने उन्हाचा त्रास होत नाही का?

कांदा खरोखरच तीव्र उष्णतेच्या लाटेपासून वाचवू शकतो का? कांद्याचा उष्णतेत फायदा होत असेल तर चांगलंच आहे. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. याबाबत आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर नीरज जाधव यांचा सल्ला घेतला. कांद्यामुळे उष्माघातापासून बचाव होतो असं आयुर्वेदातही असं कुठं ठोस नाही असं तज्ज्ञ सांगतात. तरीदेखील आमच्या टीमने आणखी एक तज्ज्ञ डॉ.अविनाश भोंडवे यांचा सल्ला घेतला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

खिशात कांदा ठेवल्याने उष्माघातापासून संरक्षण होतं हे सिद्ध झालेलं नाही

कांदा आणि उष्माघात याबद्दल कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही

ग्रामीण भागात बरेच लोक उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवून फिरतात

उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने उन्हाळ्यातील अनेक त्रासांपासून आराम मिळू शकतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत होते, असं तज्ज्ञ सांगतात. मात्र, कांदा खिशात ठेवल्याने उष्माघातापासून बचाव होतं असं कुठेही आढळलेलं नाही.यावर सध्या रिसर्च सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : मन अस्वस्थ राहील, ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस धोक्याचा; आर्थिक गणित बिघडणार

Bird Flu: राज्यात 'बर्ड फ्लू'ची एन्ट्री; पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत,दीड लाख कोंबड्यांची कत्तल होणार?

Maharashtra News Live Update: आज बारावीचा निकाल होणार जाहीर

High cholesterol: तुम्ही फिट असूनही वाढतंय कोलेस्ट्रॉल? या 4 दररोजच्या सवयींमुळे मोठा धोका

सावधान! तुम्ही खाताय घाणेरडे चिप्स? ग्राहकांच्या जीवाशी खेळ

SCROLL FOR NEXT