Beauty Skin Tips Saam TV
लाईफस्टाईल

Beauty Skin Tips : फेशिअलनंतर काही दिवसात लगेचच चेहऱ्यावर केस येतात? हा रामबाण उपाय हेअर ग्रोथ करेल गायब

Facial Hair Remove : चेहऱ्यावर आलेले छोटे छोटे केस घरच्याघरी मिनिटांत होतील गायब. फॉलो करा हा रामबाण उपाय. चेहरा मोत्यासारखा चमकेल.

Ruchika Jadhav

सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. हात आणि पायांसह चेहऱ्यावर देखील वॅक्स केलं जातं. वॅक्स करून महिला चेहऱ्यावरील केस सुद्धा काढून टाकतात. त्यामुळे चेहरा आणखी चमकदार दिसतो. मात्र असे केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा चेहऱ्यावर केस येऊ लागतात. काही व्यक्तींची हेअर ग्रोथ फार जास्त असते. त्यामुळे चेहऱ्यावर आलेल्या केसांमुळे आपला पूर्ण लूक खराब होतो. अशात आता इंस्टाग्रामवर आंचल जैन यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी चेहऱ्यावरील हेअर ग्रोथ कमी करण्याचा रामबाण उपाय सांगितला आहे.

फेशिअल हेअर रिमुवल फेसपॅकसाठी साहित्य

पीठ - २ चमचे

कॉफी पावडर - १ चमचा

पाणी - आवश्यकतेनुसार

पील ऑफ मास्क - १ चमचा

असे करा अप्लाय

तुम्हाला सर्वात आधी एक वाटी घ्यावी लागेल. वाटीमध्ये पीठ, कॉफी, पाणी आणि पील ऑफ मास्क वर दिलेल्या प्रमाणात घ्या.

सर्व मिश्रण पाण्यात एकजीव मिक्स करून घ्या. याची जास्त पातळ पेस्ट बनवू नका. चेहऱ्यावर सर्व मिश्रण घट्ट पद्धतीने पसरेल अशाच प्रकारे ते चेहऱ्यावर अप्लाय करा.

फेस मास्क चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर चेहरा पूर्ण सुकू द्या. चेहरा किमान १५ मिनिटे तरी वाळवून घ्या. चेहरा पूर्ण सुकला की, लगेचच पाण्याने तो वॉश करू नका. चेहरा सुकल्यावर तो हाताने स्क्रब करा. चेहरा स्क्रब केल्यावर यातील प्रोडक्टसह तुमच्या चेहऱ्यावरील बारीक केस सुद्धा निघून जातात.

अशा पद्धतीने केस पूर्ण निघाल्यावर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा वॉश करू शकता. चेहरा पाण्यात क्लिन करताना चेहऱ्यावर कोणतीही क्रिम किंवा फेसवॉशचा वापर करू नका. त्याने चेहऱ्यावर वेगळा इफेक्ट होण्याची शक्यता असते. तुम्ही दुसऱ्या दिवसापासून रेग्यूलर फेसवॉशने स्किन क्लिन करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT