Stroke saam tv
लाईफस्टाईल

Stroke: चेहरा तिरकस होणं, तोल जाणं...; स्ट्रोकची लक्षणं तुम्हाला माहितीये का? तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

स्ट्रोक ही एक गंभीर मेडिकल कंडीशन आहे. स्ट्रोकशी संबंधित लक्षणे वेळीच ओळखल्यास वेळीच उपचार करता येऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

स्ट्रोक ही एक गंभीर मेडिकल कंडीशन आहे. या समस्येमध्ये जात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा मानला जातो. वेळीच निदान आणि उपचार केल्यास रूग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. भारतातील परिस्थिती पाहिली तर संपूर्ण भारतात स्ट्रोकच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. स्ट्रोकमुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे. जेव्हा मेंदूच्या एका भागाला ऑक्सिजन-समृद्ध रक्ताचा पुरवठा अचानक बंद होतो किंवा कमी होतो तेव्हा स्ट्रोक होतो.

न्यूरोफिजिशियन आणि आयएसए (इंडियन स्ट्रोक असोसिएशन) चे अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या यांनी सांगितलं की, हे मेंदूच्या ऊतींना महत्वाची कार्ये करण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळण्यापासून प्रतिबंधित करतं. हे एखाद्याच्या मेंदूला गंभीरपणे नुकसान करू शकतं आणि त्याच्या/तिच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. स्ट्रोकशी संबंधित लक्षणे वेळीच ओळखल्यास वेळीच उपचार करता येऊ शकतात. यामुळे सकारात्मक परिणामांची शक्यता वाढते आणि भविष्यातील नुकसान कमी करते.

स्ट्रोकच्या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असंही करता येतं. याचा अर्थ खालीलप्रमाणे-

(बॅलेन्स - संतुलन कमी होणं, आईज- दृष्टी धूसर होणं किंवा कमी होणं, फेस- चेहऱ्याचा काही भाग क्षीण होणं, आर्म- हात कमकुवत होणं, स्पीच- बोलण्यात अडथळा, टाईम- वेळ).

B- बॅलेंस (Balance) - स्ट्रोक आलेल्या व्यक्तीच्या शरीरावरील संतुलन बिघडू लागतं. यावेळी त्या व्यक्तीला योग्य पद्धतीने बसता येत नाही. याशिवाय तो योग्यरित्या उभा देखील राहत नाही.

F-फेस (Face) - स्ट्रोकमध्ये, चेहऱ्याचा आकार बदलण्याचा धोका असतो. यावेळी एका बाजूला तिरकस होतो. यामध्ये त्या व्यक्तीला हसूही येत नाही किंवा चेहरा सरळ दिसत नाही असे घडते.

A-आर्म्स (Arms)- स्ट्रोकमध्ये हात काहीसे सैल होतात. यावेळी ते योग्यरित्या कार्य देखील करू शकत नाहीत. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर हातात जीव राहत नाही.

S-स्पीक (Speak)- स्ट्रोकमध्ये पीडित व्यक्तीला बोलण्यात अडचण येते, त्याची जीभ अडखळू लागते.

T-टाइम (Time)- स्ट्रोकमध्ये वेळ ही फार महत्वाची गोष्ट आहे. पक्षाघाताचा झटका आल्यास, वेळ न घालवता, रुग्णाला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं आहे. यावेळी रूग्णाला शक्यतो चांगल्या सुविधा असलेल्या रुग्णालयात न्या. जिथे एमआरआय, सीटी स्कॅन आणि उत्तम आयसीयू सुविधा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

SCROLL FOR NEXT