Body Odor: आंघोळीच्या पाण्यात टाका 'या' गोष्टी; शरीरातून घामाचा दुर्गंध येणार नाही!

Body Odor: घाम येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून तो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. जर आपल्याला घामातील बॅक्टेरियाचा सामना करायचा असेल तर स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
smell
smellsaam tv
Published On

आपल्या प्रत्येकाला घाम येतो. मात्र काही लोकांना अधिक प्रमाणात घाम येतो. मुळात घाम येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून तो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. यामुळे तुमच्या तुमची त्वचा निरोगी राहते शिवाय ही क्रिया तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. यामध्ये काहींना घामामुळे शरीराच्या विचित्र दुर्गंधीची समस्या असते. मुळात हा दुर्गंध घामाचा नसून घामामध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे असं होतं.

अनेकदा चारचौघात घामाची दुर्गंधी व्यक्तीला लाजवते. ते टाळण्यासाठी लोक अनेक प्रकारची महागडी डिओडोरंट्स आणि परफ्युम्सचा वापर करतात. जर आपल्याला घामातील बॅक्टेरियाचा सामना करायचा असेल तर स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या पाण्यात टाकल्याने आंघोळ केल्यास घामाचा दुर्गंध येत नाही.

smell
Quit White Rice: महिनाभर पांढरा भात खाणं सोडलं तर? पाहा शरीरावर काय होतो परिणाम?

सकाळी आंघोळ करताना काही गोष्टी पाण्यात टाकल्या तर घामाच्या दुर्गंधीपासून सुटका तर होते. त्याचप्रमाणे तुम्हाला दिवसभर ताजेतवानं वाटू शकतं. या नैसर्गिक गोष्टी बॅक्टेरियाविरोधी असण्यासोबतच चांगला सुगंधही देतात.

तुरटी ठरेल फायदेशीर

घामामुळे होणाऱ्या बॅक्टेरिया सामना करण्यासाठी तुरटी हा एक उत्तम घटक आहे. आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी पावडर टाकून मिक्स करा. यावेळी तुम्ही सुगंधासाठी तेलाचे काही थेंब किंवा गुलाबपाणी घालू शकता.

बेकिंग सोडा

आंघोळीच्या पाण्यातही बेकिंग सोडा टाकू शकता. जर घामाचा दुर्गंध खूप त्रास देत असेल तर पाण्यासोबत बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून अंडरआर्म्सवर लावा. यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल आणि घामाच्या वासापासूनही संरक्षण मिळू शकतं.

ग्रीन टी आणि लिंबाचा रस

ग्रीन टी आणि लिंबू हे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. घामामुळे येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात या दोन गोष्टी मिसळू शकता. ग्रीन टी उकळून आंघोळीच्या पाण्यात मिसळा किंवा लिंबाचा रस वापरता येईल. यामुळे त्वचेवरील कोरडेपणापासूनही आराम मिळेल.

smell
Weight Loss : जीम, डाएट सोडा... फक्त पाणी पिऊन कमी करू शकता वजन; पाहा कसं

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com