Manasvi Choudhary
दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. आज सर्वत्र लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
याचनिमित्त लक्ष्मीपूजन कसे करायचे? साहित्य काय? याविषयी जाणून घ्या.
आज २१ ऑक्टोबर २०२५ लक्ष्मीपूजन आहे. सांयकाळी तुम्हाला कधीही लक्ष्मीपूजन करता येणार आहे.
एका पाटावर लाल वस्त्र टाकावे. नंतर अक्षता ठेवून माता लक्ष्मीचा फोटो ठेवा.
पाटाच्या उजव्या बाजूला कळसात विड्याचे पाने एक रूपयाचे नाणे टाकावे नंतर नारळ ठेवावा.
चौरंगावर विड्याची पाने माडांवी. पाच फळे ठेवावी. यानंतर बाजूला हिशोबाची वही आणि पेन ठेवा.
एका ताटात धन टाकून पैसे नाणी ठेवा त्याची पूजा करा. त्यांनतर देवीला हळद- कुंकू लावून पूजा करा.