Manasvi Choudhary
आज लक्ष्मीपूजन हा दिवस आहे. लक्ष्मीपूजन हा अत्यंत शुभम दिवस मानला जातो.
लक्ष्मीपूजनात माता लक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे घरात सुख- समृद्धी येते.
लक्ष्मी देवीला नारळ प्रिय आहे. यामुळे लक्ष्मीपूजनात तुम्ही नारळ अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते.
लक्ष्मीपूजनाच्या वेळी महालक्ष्मी स्त्रोताचे पठण करा यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते.
लक्ष्मीपूजनाच्या वेळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा व कापरासोबत आरती करावी असे केल्याने देखील देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
लक्ष्मीपूजन करताना उत्तर दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते.
लक्ष्मीपूजनानंतर धान्य, दूध, मिठाई याचे दान केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.