डोळे हा मानवाच्या शरीराचा महत्वाचा अवयव आहे. डोळे फडफडणे सामान्य लक्षण आहे. डोळे फडफडल्याने शुभ, अशुभ होणार असे मानले जाते. डोळा फडफडला की शुभ असेल की अशुभ असा प्रश्न तुम्हालाही पडतच असेल मात्र शास्त्रानुसार डोळा फडफडल्याने नेमके कोणते संकेत मिळतात हे जाणून घ्या. पुरूष आणि महिलांसाठी डोळे फडफडण्याची वेगवेगळे अर्थ असतात. सामुद्रिक शास्त्रात याबाबत माहिती दिली आहे.
उजवा डोळा फडफडण्याचा अर्थ
महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. जर एखाद्या मुलीचा उजवा डोळा फडफडला तर ते भांडण, वाईट बातमी, आर्थिक नुकसान किंवा एखाद्या प्रयत्नात अपयश येते. तर पुरूषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. आर्थिक लाभ संभावणार आहे.
डावा डोळा फडफडणे
महिलाचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते. आर्थिक समस्या दूर होतील. लवकरच चांगली बातमी समजेल. तर पुरूषांसाठी डावा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. भांडण, व्यवसायात तोटा होण्याची शक्यता असते.
दोन्ही डोळे एकत्र फडफडणे
जर एखाद्या व्यक्तीचे दोन्ही डोळे फडफडत असतील तर ते एखाद्या जुन्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला भेटण्याचे संकेत देते.
अशुभ संकेत दिसल्यास काय करावे?
१) घरामध्ये देवाऱ्हात तुपाचा दिवा लावा. देवाकडे प्रार्थना करा.
२) देवाचा मंत्राचे जप करा आणि सकारात्मक विचार करा.
३) देवीजवळ तुपाचा दिवा लावा आणि प्रसाद म्हणून खीर अर्पण करा.
४) हनुमान चालिसा पठण करा. ज्यामुळे भीती, चिंता आणि त्रासापासून संरक्षण होईल.
५) गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करा पांढरे वस्त्र दान करा.
६) तुळशीची पाने खा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.