sleep problems yandex
लाईफस्टाईल

Sleep Problem: दिवसा झोप येतेय म्हणजे शरीर देतंय ‘SOS’ सिग्नल? कारण वाचून धक्का बसेल

Narcolepsy symptoms daytime sleepiness: नार्कोलेप्सी हा एक गंभीर झोपेचा विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला दिवसा अत्याधिक झोप येते. हा विकार अनेकदा दुर्लक्षित केला जातो, पण वेळेत ओळखल्यास जीवनशैलीत बदल करून त्याचे व्यवस्थापन करता येते.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्यापैकी अनेकांना ऑफिसमध्ये गेल्यावर जांभई आणि खूप झोप येऊ लागते. याकडे आपण थकवा किंवा रात्री झोप पूर्ण झाली नसेल. मात्र बऱ्याचदा झोप पूर्ण होऊन देखील तुम्हाला झोप येते. याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर सावध व्हा. याचं कारण म्हणजे हे नार्कोलेप्सी सारख्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

काय आहे नार्कोलेप्सी?

नार्कोलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. जो मेंदूच्या झोपेच्या आणि जागे होण्याच्या चक्रांवर परिणाम करतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही स्थिती दुर्मिळ आहे, परंतु त्याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या अभ्यासावर, कामावर आणि आणि दैनंदिन जीवनावर पडू शकतो.

नार्कोलेप्सी ही असा गंभीर आजार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दिवसा अचानक आणि जास्त झोप येते. ही झोप नकळत येते आणि कधीही, कुठेही येऊ शकते. ही स्थिती सामान्यतः १० ते ३० वयोगटातील सुरू होते.

नार्कोलेप्सीचे प्रकार

नार्कोलेप्सीचे दोन मुख्य प्रकार आहेत. यामध्ये टाईप १ नार्कोलेप्सीमध्ये अचानक झोप येणं आणि मसल कमजोर होणं अशी लक्षणं दिसून येतात. टाईप २ नार्कोलेप्सीमध्ये दिवसा जास्त झोप येते परंतु मसल्सवर याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. लक्षणं सौम्य असल्याने, त्याचं निदान अनेकदा उशिरा होण्याची शक्यता असते.

काय आहेत नार्कोलेप्सीची लक्षणं?

  • स्लिप पॅरालिसिस

  • रात्रीच्या झोपेत विचित्र स्वप्नं पडणं

  • झोप घेऊननही थकवा येणं

  • ऑटोमॅटिक बिहेवियर

कसं केलं जातं याचं निदान?

या परिस्थितीचं निदान करण्यासाठी डॉक्टर विशिष्ट चाचण्या करतात. पॉलीसोम्नोग्राफी आणि मल्टिपल स्लीप लेटन्सी टेस्ट (MSLT) केली जाते. ज्यामुळे दिवसा तुम्ही किती लवकर झोपता हे याची माहिती मिळण्यास मदत होते.

कसे केले जातात यावर उपचार?

नार्कोलेप्सी पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र योग्य काळजी घेतल्यास त्याला नियंत्रणात ठेवणं शक्य आहे. औषधे, कॅटप्लेक्सी, स्लीप पॅरालिसिससाठी अँटीडिप्रेसेंट्स आणि मेंदूच्या रसायनांवर परिणाम करणारी नवीन औषधं याद्वारे यावर उपचार केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Skin Face Pack: ड्राय स्किनसाठी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा, घरच्या घरीच ट्राय करा 'हा' फेस पॅक, मिळेल सॉफ्ट स्किन

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार

Designer Sarees: न्यू ईअर पार्टीला सगळ्यात हटके दिसायचंय? मग या ४ लेटेस्ट डिझाइनर साड्या आत्ताच करा खरेदी

Pune : ना जागावाटप, ना उमेदवार; नुसत्याच चर्चा, जोरबैठका; पुण्यात कन्फ्युजनही कन्फ्युजन, सोल्यूशनचा पत्ताच नाही!

गुप्त ठिकाणी बैठक, हातात बंद लिफाफे मनसे आणि ठाकरे गटात नेमकं काय घडतंय? VIDEO

SCROLL FOR NEXT