Elon Musk
Elon Musk Saam Tv
लाईफस्टाईल

New Twitter CEO Hired: एलन मस्क ट्विटरचे 'सीईओ' पद सोडणार? आता ट्विटरवरही महिलेचं राज्य...

Vishal Gangurde

Elon Musk News: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क हे ट्विटरचे सीईओ पद सोडणार आहे. मस्क यांनी त्यांना ट्विटरच्या सीईओ पदासाठी नव्या व्यक्तीची नियुक्ती केल्याची घोषणा ट्विटरद्वारे केली आहे. नव्या ट्विटर 'सीईओ'ची माहिती अद्याप दिलेली नाही, परंतु आता 'सीईओ' पदावर एक महिला असणार असल्याचं नक्की झालं आहे. (Latest Marathi News)

एलन मस्क यांनी ट्वीटरचे खरेदी केल्यानंतर सीईओ पदासाठी शोध सुरू केला होता. परंतु त्यांना योग्य उमेदवार मिळाला होता. याचदरम्यान, मस्क यांनी त्यांना सीईओ पदासाठी उमेदवार मिळाल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी लवकरच नव्या 'सीईओ'बद्दल माहिती मिळेल.

ऑक्टोबरमध्ये ट्विटरची खरेदी

एलन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटरची खरेदी केली होती. तेव्हापासून मस्क 'सीईओ' पदावर विराजमान आहेत. मस्क ट्विट करत म्हटले की, ट्विटरच्या सीईओ पदावर नवा व्यक्ती विराजमान झाल्यावर माझी भूमिका बदलेल'. तसेच ते कोणत्याही कंपनीचे सीईओ बनू इच्छित नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महिला होणार ट्विटरची सीईओ

एलन मस्क यांनी ट्विट करत म्हटले की, 'मला घोषणा करण्यास आनंद होत आहे की, मी नव्या ट्विटरच्या सीईओची नियुक्ती केली आहे. सहा आठवड्यात याबाबत माहिती समोर येईल. या पदावर एक महिला नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच यानंतर माझ्या भूमिका ही उत्पादन, सॉफ्टवेयर आणि sysops पाहण्यासाठी कार्यकारी अध्यक्ष आणि सीटीओ असणार आहे'.

मस्क यांनी ग्वाही दिली होती, 'ट्विटरच्या कामाचा वेळ कमी करण्यासहित यासाठी नवी व्यक्ती शोधण्याची गरज आहे. त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचेही सांगितले होते. दरम्यान, मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT