IRCTC Kashmir Tour : IRCTC चा नवा टूर प्लान ! स्वस्तात मस्त प्रवास, उन्हाळ्यात करा बहार-ए-काश्मीरमध्ये मजा

Kashmir Tour : इथलं दृश्य उन्हाळ्यात वेगळं आणि हिवाळ्यात वेगळं.
IRCTC Kashmir Tour
IRCTC Kashmir TourSaam Tv
Published On

IRCTC Bahar-E-Kashmir : काश्मीरला विनाकारण पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जात नाही. इथे गेल्यावर हे ठिकाण किती सुंदर आहे याची कल्पना येईल. इथलं दृश्य उन्हाळ्यात वेगळं आणि हिवाळ्यात वेगळं. म्हणजे प्रत्येक ऋतूत तुम्हाला काश्मीर वेगळ्या पद्धतीने दिसेल.

त्यामुळे कडक उन्हापासून (Summer) दूर सुट्टी घालवण्यासाठी तुम्ही थंड (Cold) ठिकाणाच्या शोधात असाल तर काश्मीरपेक्षा चांगला पर्याय कोणता असू शकतो. अशा लोकांसाठी IRCTC ने एक अप्रतिम पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये तुम्ही इथे अनेक सुंदर ठिकाणांना एकत्र भेट देऊ शकाल. या पॅकेजबद्दल जाणून घेऊया.

IRCTC Kashmir Tour
IRCTC Vaishno Devi Tour : IRCTC ने आणली माता वैष्णोदेवीच्या दर्शनाची उत्तम संधी, काय आहे संपूर्ण पॅकेज? जाणून घ्या

IRCTC बहार-ए-काश्मीर टूर पॅकेज तपशील -

  • पॅकेजचे नाव - बहार-ए-काश्मीर

  • पॅकेज कालावधी- 6 रात्री आणि 7 दिवस

  • प्रवास मोड - फ्लाइट

  • कव्हर केलेले ठिकाणे - गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर, सोनमर्ग

  • सुटण्याच्या तारखा- 27 मे, 17 जून, 24 जून, 15 जुलै, 25 जुलै, 19 ऑगस्ट

तुम्हाला मिळतील या सुविधा -

  • येण्या-जाण्यासाठी इकॉनॉमी क्लासचे विमान तिकीट (Ticket) उपलब्ध असेल.

  • राहण्यासाठी हॉटेलची सुविधा असेल. श्रीनगरमध्ये 2 रात्री, सोनमर्गमध्ये 1 रात्र, पहलगाममध्ये 2 रात्री आणि डीलक्स हाउसबोटीमध्ये 1 रात्र.

  • 6 नाश्ता आणि 6 रात्रीच्या जेवणाची सुविधा उपलब्ध असेल.

  • रोमिंगसाठी वाहनाची सुविधा उपलब्ध असेल.

IRCTC Kashmir Tour
IRCTC Tour Package : रेल्वेची प्रवाशांसाठी ग्रेट- भेट; IRCTC च्या सुविधांसह नेपाळ-काठमांडूपर्यंत माफक दरात प्रवास...

या सुविधा मिळणार नाहीत -

  • फ्लाइटमधील खाण्यापिण्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील.

  • तुम्हाला तुमच्या आवडत्या सीटसाठी वेगळे पैसे द्यावे लागतील.

  • प्रवासात तुम्हाला तुमच्या दुपारच्या जेवणाचे व्यवस्थापन करावे लागेल.

  • भेट देण्याच्या ठिकाणांसाठी प्रवेश शुल्क आणि जर तुम्ही गाईड घेतले तर तुम्हाला ते स्वतः भरावे लागेल.

  • टीप, विमा, अल्कोहोल, कॅमेरा चार्ज, टेलिफोन कॉल, मसाज इत्यादी देखील पॅकेजमध्ये समाविष्ट नाहीत.

प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल -

  • या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 63,800 रुपये मोजावे लागतील.

  • त्याच वेळी, दोन लोकांना प्रति व्यक्ती 53,900 रुपये शुल्क भरावे लागेल.

  • तीन लोकांना प्रति व्यक्ती 52,100 रुपये शुल्क द्यावे लागेल.

  • मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. बेडसह 41,500 आणि बेडशिवाय 38,300 रुपये मोजावे लागतील.

तसे, वेगवेगळ्या महिन्यांत सहलीच्या बजेटमध्ये थोडेफार बदल होतात, जे तुम्ही IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन तपासू शकता.

IRCTC Kashmir Tour
Chardham Yatra Tour : चारधाम यात्रेवर IRCTC चे नवे टूर पॅकेज, कशी कराल बुकिंग ? किती येईल खर्च ?

IRCTC ने ट्विट करून माहिती दिली -

IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला काश्मीरच्या या सुंदर ठिकाणांना भेट द्यायची असेल, तर तुम्ही IRCTCच्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

अशा प्रकारे तुम्ही बुक करू शकता -

तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com