Chardham Yatra Tour : चारधाम यात्रेवर IRCTC चे नवे टूर पॅकेज, कशी कराल बुकिंग ? किती येईल खर्च ?

IRCTC Tour Package : पुढील आठवड्यापासून चारधाम यात्रा सुरू होत आहे.
Chardham Yatra Tour
Chardham Yatra Tour Saam Tv

Chardham Yatra Tour Pakage : पुढील आठवड्यापासून चारधाम यात्रा सुरू होत आहे. या यात्रेअंतर्गत, उत्तराखंड राज्यातील चार पवित्र तीर्थक्षेत्रे - बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला भेट दिली जाईल. गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी उघडत आहेत. केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला उघडतील आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडतील.

IRCTC प्रवाश्यांसाठी खास ऑफर्स (Offer) आणल्या आहेत. या ऑफरमध्ये तुम्हालाचार धाम फिरण्यासाठी जाता येणार आहे. खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला फक्त 40,100 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये 11 रात्री आणि 12 दिवसांचा प्रवास देण्यात येईल. यासह या प्रवासात तुम्हाला गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ दाखवले जाईल. याशिवाय तुम्हाला फक्त 2 धामचा प्रवास (Travel) करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला, 34,6500 रुपये खर्च करावे लागतील.

Chardham Yatra Tour
Indian Railway IRCTC App : तिकीट बुक करताना IRCTC अॅपवर अकाउंट कसे बनवाल ? प्रोसेससाठी फॉलो करा स्टेप-बाय-स्टेप

किती खर्च येईल -

तुम्ही irctctourism.com या वेबसाइटला भेट देऊन चारधाम यात्रेसाठी टूर (Tour) पॅकेज बुक करू शकता. मुंबईसाठी हे टूर पॅकेज (Package) विमानाने असेल. तिहेरी वहिवाटीसाठी प्रति व्यक्ती 67,000 रुपये द्यावे लागतील. सिंगल लोकांसाठी 91,400 रुपये आणि दुहेरी लोकांसाठी 69,900 रुपये असतील. हे पॅकेज 21 मेपासून सुरू होणार आहे.

दिल्लीहून irctc टूर पॅकेज -

1 मे, 5 मे, 1 जून, 15 जून, 1 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर रोजी दिल्लीतून चारधाम यात्रेसाठी टूर पॅकेजेस सुरू करण्यात येणार आहेत. या अंतर्गत, दिल्लीतून तिहेरी वहिवाट प्रति व्यक्ती 59,360 रुपये असेल. इंदूर आणि भोपाळमधून प्रति व्यक्ती 62,100 रुपये मोजावे लागतील. याशिवाय पाटणाहून हवाई पॅकेजची किंमत 67,240 रुपयांपासून सुरू होईल.

Chardham Yatra Tour
IRCTC Tour Package : उन्हाळ्याच्या सुट्टीत जन्नत-ए-काश्मीरमध्ये करा पिकनिकचा प्लॅन, 6 दिवसांच्या स्पेशल फ्री टूर

चारधाम यात्रेसाठी नोंदणी कशी करावी -

  • चारधाम यात्रेला जात असाल तर नोंदणी अनिवार्य आहे.

  • नोंदणी करण्यासाठी, प्रथम registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाइटवर जा

  • आता नाव, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका, पासवर्ड कन्फर्म करा

  • यानंतर मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका

  • आता पासवर्डने पुन्हा लॉगिन करा आणि नोंदणीसाठी पुढे जा

  • तुम्ही पॅकेज, तारीख आणि इतर माहिती टाकून नोंदणी पूर्ण केली आहे

  • आता पास डाउनलोड करा

या नंबरवर संपर्क करा -

कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आयआरसीटीसीने दिलेला हेल्पलाइन नंबर 9717641764, 8287930908, 8287930909, 8595930981 आणि 8287930910 येथे संपर्क साधा.

Chardham Yatra Tour
Puneri Patya | पुणेरी पाट्या कोणी सुरू केल्या? पाहूयात या मागची कहाणी

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com