Electric Shock Safety  Saam Tv
लाईफस्टाईल

Electric Shock Safety: पावसात विजेचा झटका लागू नये यासाठी काय करावे? विद्युत सुरक्षेसाठी वीज कंपन्याचा काय आहे सल्ला?

Monsoon Electric Tips: पावसाळा सुरू होताच विजेचा झटका लागणे, आग लागणे अशा अनेक घटना घडत असतात. पावसाळ्यात अशा घटनांपासून वाचण्यासाठी काय सतर्कता बाळगावी जाणून घेऊया.

Sejal Purwar

पावसाळा सुरू होताच विजेचा झटका लागणे, आग लागणे अशा अनेक घटना घडत असतात. कारण पाणी आणि विजेचे मिश्रण अत्यंत धोकादायक आहे. अनेकवेळा अशा घटनांमुळे आपला जीव देखिल जाऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा घटनांपासून वाचण्यासाठी काय सतर्कता बाळगावी जाणून घेऊया.

विजेचा झटका(current) लागला तर?

कोणत्याही व्यक्तीला विद्युत प्रवाहाचा झटका अर्थातच करंट लागल्यास त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकवेळा एखाद्या व्यक्तीला विजेचा झटका बसताना पाहून, त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र गडबडीत दोघेही विजेच्या संपर्कात येतात. अशा परिस्थितीत, सर्वप्रथम लक्षात ठेवा की विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीला थेट स्पर्श करू नका. करंट लागलेल्या व्यक्तीला कोरड्या लाकडाने किंवा कोणत्याही कोरड्या काठीने थेट प्रवाहापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करा. करंट लागलेल्या वायरमधून व्यक्तीची सुटका करणे शक्य नसेल तर ज्या ठिकाणाहून विद्युतप्रवाह येत आहे. तेथील कनेक्शन त्वरित बंद करा अर्थातच मेन स्वीच बंद करा. पीडित व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात घेऊन जा. जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल.

काय खबरदारी घ्यावी...

1.पावसाळा सुरू होण्यापूर्वी, वायरिंग, सॉकेट्स आणि उपकरणांसह सर्व विद्युत प्रवाहांची तपासणी करावी. तुटलेल्या तारा, सैल कनेक्शन आणि खराब झालेले इन्सुलेशन त्वरित दुरूस्त करावे.

2.दिवे, पंप आणि घराबाहेरील सॉकेट यांसारखी सर्व घराबाहेरील विद्युत उपकरणे तपासा. या उपकरणांमध्ये पाणी जाणार नाही याची खबरदारी घ्या. वेदरप्रूफ नसलेली उपकरणे वापरल्याने शॉर्टसर्किट आणि विजेचे शॉक लागण्याचा धोका वाढतो.

3. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर असताना विद्युत उपकरणे किंवा बटणांना स्पर्श करू नका. विद्युत उपकरण हाताळण्यापूर्वी आपले हात नेहमी चांगले कोरडे करा.

4. मुसळधार पाऊस आणि वादळादरम्यान उपयोगात नसलेली उपकरणे अनप्लग करा. टेलीव्हिजन, कॉम्प्युटर आणि मायक्रोवेव्ह यांसारखी उपकरणे जोरदार पावसात वापरू नका.

5. इलेक्ट्रिकल साधने नेहमी कोरडे ठेवा. बाहेरील आउटलेटसाठी वॉटरप्रूफ कव्हर वापरा आणि इनडोअर कॉर्ड्स उंच ठेवा शिवाय या साधनांना पाण्याच्या स्त्रोतांपासून दूर ठेवा.

6.सर्किट ब्रेकर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हे सर्किटओव्हरलोड किंवा शॉर्टसर्किट झाल्यास विद्यूत पुरवठा खंडित करते. यामुळे हे सर्किट ब्रेकरचे बटण चालू आहे किंवा नाही याची खात्री करा.

7. घरातील प्रत्येकाला खास करून मुलांना विजेचे धोके आणि विद्युत उपकरणे कशी हाताळावी याची माहिती द्या. जेणेकरून अनूचित प्रकार घडणार नाही.

8.हवामान अंदाजांची माहिती घेत रहा. अतिवृष्टीशी संदर्भातील इशाऱ्यांबद्दल माहिती ठेवा.

9. शेताच्या कड्यावर विद्युत खांब असल्यास योग्य अंतर ठेवूनच काम करा. विजेच्या खांबावर स्पार्किंग होत असेल तर ताबडतोब संबंधित सब स्टेशनला माहिती द्या.

10. एखाद्या झाडाजवळून विजेच्या तारा जात असतील तर त्याच्या जवळ न जाता वीज विभागाला त्या तारा काढण्यास किंवा झाडाची छाटणी करण्यास सांगा.

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. अशात आगीच्या किंवा विजेच्या झटक्यामुळे जीव गमावल्याच्या अनेक बातम्या समोर येतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा घटनांपासून वाचण्यासाठी लहान-सहान गोष्टींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. सावधानता बाळगत सतर्क रहाण्यात शहाणपण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT