Electric Vehicle News  Saam Digital
लाईफस्टाईल

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

clean air: भारतात नुकताच दिवाळी सण पार पडला. या सणानंतर भारताला वायू प्रदुषणाचा सामना करावा लागला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतात नुकताच दिवाळी सण पार पडला. या सणानंतर भारताला वायू प्रदुषणाचा सामना करावा लागला होता. तसेच बाकू, अझरबैजानमध्‍ये सीओपी२९ (COP29)ची सुरूवात होताच हवेचा दर्जा खालावण्‍याच्‍या संकटाचा सामना पुन्हा भारताला करावा लागत आहे. ही बाब अतीशय चिंताजनक आहे. त्यातच भारताचे नाव सर्वात प्रदुषित शहरांमध्ये येत आहे. याचा सगळ्यात गंभीर परिणाम ५ वर्षांखालील मुलांवर होत आहे. या मुलांच्या मुत्युचा आकडा ४६४ ऐवढा आहे.

सध्याच्या वातावरणातील बिघाडामुळे २०४७ सालापर्यंत विकसित अर्थव्‍यवस्‍था बनण्‍याच्‍या भारताच्‍या महत्त्वाकांक्षांमध्‍ये अडथळा येण्‍याचा धोका निर्माण झाला आहे. याचे समस्येचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे वाहन उत्सर्जन. मग यावर संपूर्ण विश्‍व शाश्‍वत गतीशीलतेला प्राधान्‍य देत असताना इलेक्ट्रिक वेईकल्‍स (ईव्‍ही) महत्त्वपूर्ण सोल्‍यूशन ठरल्‍या आहेत. याचा वापर केल्याने आपण सगळ्यात जलद गतीने प्रदुषणांच्या संकटाचा सामना करु शकतो.

भारतात ईव्‍ही चार्जिंग स्‍टेशन्‍स

भारतच नाही तर चीन, नेपाळ, जर्मणी, जपान यांसारख्या देशांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल वापरणे सुरु केले आहे. त्यामुळे प्रदुषण आटोक्यात आणणे सोपे होऊ शकते. मुंबईत, तसेच महाराष्‍ट्राच्‍या इतर भागांमध्‍ये ईव्‍ही चार्जिंग स्‍टेशन्‍स किंवा सार्वजनिक चार्जिंग स्‍टेशन उभारण्‍याचे प्रमाण वाढत आहे. आजच्‍या युगातील कार खरेदीदारांसाठी ईव्‍ही योग्‍य पर्याय असण्‍यामागील कारण काय आहे? हे आपण पुढे जाणून घेणार आहोत.

इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर वाढल्यास काय परिणाम होतील?

जागतिक सर्वेक्षणांमधून इलेक्ट्रिफाइंग परिवर्तनासाठी विविध लक्षवेधक कारणे समोर आली आहेत. त्यात पर्यावरणावर सकारात्मक परिणाम, कमी मालकीहक्क खर्च, उत्साहवर्धक ड्रायव्हिंगचा उत्तम अनुभव आणि शांतमय राइडचा आनंद यांसारखा चांगला परिणाम आपण अनुभवू शकतो. राज्यातील विविध ईव्ही मालकांना त्यांचे मत विचारले आणि अभिप्राय अत्यंत सकारात्मक होता.

इलेक्ट्रिक व्हेईकलचा अनुभव

इलेक्ट्रिक व्हेईकल चालवायला एकदम सोपी आहे. त्यामध्ये शांतमय, आरामदायक प्रवासाचा आपण अनुभव घेवू शकतो. तसेच शुद्ध हवेच्या वातावरणात असल्याचा फील आपल्याला होतो. तसेच हरित भारत घडवण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याची गरज आपल्याला आहे.

महाराष्‍ट्र वाढत्‍या सोलार क्षमतेसह देशामध्‍ये अग्रस्‍थानी आहे, ज्‍याचे मोठे श्रेय पंतप्रधान सूर्या घर उपक्रमाला जाते. ज्‍यामुळे सरकारी अनुदानांच्‍या माध्‍यमातून सौर ऊर्जा अधिक प्रमाणात उपलब्‍ध होण्‍याजोगी झाली आहे. टाटा पॉवर व अदानी ग्रुप यांसारख्‍या खाजगी कंपन्‍या देखील राज्‍यभरात चार्जिंग पायाभूत सुविधा वाढवत आहेत. टाटा पॉवर विविध ईव्‍ही चार्जिंग सोल्‍यूशन्‍स लाँच करत आहेत, ज्‍यामुळे बस किंवा होम सेटअपसाठी फास्‍ट चार्जरची गरज असल्‍यास ते सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याची खात्री देत आहेत.

कमी देखभाल, रस्‍त्‍यावर अधिक ड्रायव्हिंगचा आनंद

ईव्‍हींसाठी देखभाल खर्च खूप कमी होतो, जो पारंपारिक वाहनांच्‍या तुलनेत जवळपास ५० टक्‍के कमी आहे. इंटर्नल कम्‍बशन इंजिन्‍समधील १,००० हून अधिक मूव्हिंग पार्टसच्‍या तुलनेत इलेक्ट्रिक वेईकल्‍समध्‍ये फक्‍त जवळपास २०० मूव्हिंग पार्टस् असल्‍यामुळे ऑइल बदलणे व उत्‍सर्जन तपासणीची गरज भासत नाही. रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग तंत्रज्ञान ब्रेक्‍समधील बिघाड कमी करते, ज्‍यामुळे वेईकल कमी दुरूस्‍तीच्‍या गरजेसह रस्‍त्‍यावर अधिक ड्रायव्हिंग आनंद देते.

शुद्ध भविष्‍य

नागरिक म्हणून आपण पर्यावरणाचा सकारात्मक विचार करणे महत्वाचे आहे. दरवर्षी आपल्या शहराचा हवेचा दर्जा खालावत असतो, त्यामुळे ईव्‍हीची निवड करणे योग्य राहील. बॅटरी तंत्रज्ञानामध्ये नुकतेच करण्यात आलेल्या सुधारणा ईव्हीला अधिक लक्षवेधक बनवत आहेत. तसेच अनेक मॉडेल्स एका चार्जमध्ये जवळपास ३०० किमीची रेंज देत आहेत. सुधारित ड्रायव्हिंग पायाभूत सुविधा, तसेच फास्ट-चार्जिंग स्टेशन अशा सेवांसह ड्रायव्हर्स जलदपणे ईव्ही शहरातील ड्रायव्हिंग आणि लांबच्या प्रवासासाठी व्यावहारिक पर्याय बनल्या आहेत.

Written By: Sakshi Jadhav

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT