Shruti Vilas Kadam
पिस्त्यामध्ये हेल्दी फॅट्स, ओमेगा-फॅटी अॅसिड्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात.
पिस्ते फायबर आणि प्रोटीनने समृद्ध असल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि स्नॅकिंग कमी होते.
पिस्त्यात ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन हे घटक असतात जे डोळ्यांची दृष्टी सुधारतात आणि वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या टाळतात.
पिस्त्यातील हेल्दी फॅट्स आणि फायबर रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात, विशेषतः डायबिटीस असलेल्या व्यक्तींना हे फायदेशीर.
पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन-E मुबलक प्रमाणात असते, जे त्वचेचा ग्लो वाढवते आणि केसांना बळकट करते.
पिस्ते फायबरयुक्त असल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते, कब्जासारख्या तक्रारी दूर होतात.
पिस्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन-B6 असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.