हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यात अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यायची असते. हिवाळ्यात कारची विशेष काळजी घ्यायची असते. अनेकदा हिवाळ्यात कारमध्ये अनेक प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच काळजी घेणे फायदेशीर ठरते. कारची काळजी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.
बाजारात सध्या इलेक्ट्रीक कारची क्रेझ वाढताना दिसत आहे. हिवाळ्यात इंधनावर चालणाऱ्या कारपेक्षा ईलेक्ट्रीक कारची जास्त काळजी घ्यायची असते. कारबाबत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही खबरदारी घ्यायची असते.
1. इलेक्ट्रीक कार कव्हर्ड पार्किंगमध्ये ठेवा
हिवाळ्यात कार कव्हर्ड पार्किंगमध्ये ठेवा. जेणेकरुन बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होईल. जेव्हा कार कव्हर्ड पार्किंगमध्ये असते तेव्हा रुम टेम्परेचरवर तापमान असते. त्यामुळे कारला फायदा होतो. कार उघड्यावर पार्क केल्यास तापमान कमी असते. त्याचा बॅटरीवर परिणाम होतो.
2. फास्ट चार्जिंग करु नका
थंडीच्या काळात ईलेक्ट्रीक कारची फास्ट चार्जिंग करु नका. असे केल्याने बॅटरीला धोका निर्माण होऊ शकतो. कमी तापमानात जर कार वेगाने चार्ज केली कर बॅटरीची क्षमता कमी होते. त्यामुळे हिवाळ्यात नॉर्मल चार्जरने कार चार करा.
3. टायरची काळजी घ्या
कारसाठी टायर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कार चालवताना गती ही टायरवर अवलंबून असते. हिवाळ्यात कारच्या टायरची काळजी घ्यावी लागते. घराबाहेर पडताना नेहमी कारमधील हवा तपासून घ्या.
4. इको मोडचा वापर करा
इलेक्ट्रीक कारमध्ये अनेक मोड दिले जातात. त्यात इको मोड, नॉर्मल मोड असे पर्याय असतात. हिवाळ्यात कारची रेंज जास्त हवी असेल तर इको मोडचा वापर करा.
5. रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी
इलेक्ट्रिक कारमध्ये रेंज वाढवण्यासाठी रिजनरेटिव्ह टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. कार जास्त अंतरापेक्षा चालवण्यासाठी ही टेक्नॉलॉजी फायदेशीर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.