Reasons For Lack of Sleep Saam Tv
लाईफस्टाईल

Lack of sleep health risks: फक्त थकवा नाही! वाचा अपुरी झोप तुमच्या मेंदूची ताकद कशी कमी करते

Effects of sleeping less than 6 hours daily: अपुरी झोप तुमच्या मेंदू, हृदय आणि संपूर्ण आरोग्यावर कसा परिणाम करते जाणून घ्या. योग्य झोप का महत्त्वाची आहे आणि दररोज किती तास झोप हे जाणून घेऊया

Surabhi Jayashree Jagdish

सध्या प्रत्येकाची जीवनशैली इतकी आपल्याला स्वतःसाठीही वेळ नसतो. यामध्ये आपण सातत्याने दुर्लक्षित करतो ती समस्या म्हणजे अपुरी झोप. मोबाईलचा वाढता वापर, कामाचा ताण आणि उशिरापर्यंत जागरण या सगळ्यामुळे अनेकजण पुरेशा प्रमाणात झोप घेत नाही. मात्र याचे दुष्परिणाम केवळ थकव्यापुरते दिसून येत नाहीत तर शरीर आणि मेंदूवरही याचे परिणाम होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे

आकाश हेल्थकेअर मधील डायरेक्टर आणि न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मधुकर भारद्वाज यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. अपुऱ्या झोपेचे काय परिणाम होतात याबाबत त्यांनी माहिती दिलीये.

मेंदूवर थेट परिणाम

झोपेची कमतरतेचा सर्वात पहिला परिणाम हा तु्मच्या मेंदूवर परिणाम करतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पुरेशी झोप न घेतल्यास लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती आणि विचार करण्याची ताकदही कमी होते.

मूडवर होतो परिणाम

झोप कमी झाली की, त्याचा परिणाम थेट तुमच्या मूडवर दिसून येतो. अशावेळी व्यक्ती चिडचिड करते आणि ताणतणावात वाढ होते. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास डिप्रेशनचाही धोका वाढू शकतो.

इम्यून सिस्टम कमजोर होण्याची शक्यता

जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांचा त्रास होतो. झोपेतच शरीर स्वतःची दुरुस्ती करत असतं. मात्र झोप अपुरी राहिल्यास ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडत नाही आणि त्यामुळे इम्यून सिस्टम नीट काम करू शकत नाही.

वजन वाढण्याचा धोका

पुरेशा प्रमाणात झोप झाली नाही की शरीराच्या मेटाबॉलिझमवरही परिणाम होत असतो. यामुळे भूक वाढवणारे हार्मोन्स अधिक एक्टिव्ह होतात. अशावेळी जास्त खाण्याची सवय लागू शकते. परिणामी वजन वाढण्याचा धोका असतो.

हृदयाच्या आरोग्यावरही होतो परिणाम

तज्ज्ञांच्या मते, कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असतो. अशा व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अपुरी झोप घेऊ नये.

किती तासांची झोप आवश्यक?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, प्रौढ व्यक्तीने दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घेणं गरजेचं आहे. लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांना यापेक्षा जास्त झोप आवश्यक असते. याशिवाय झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवणं, झोपण्यापूर्वी मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर राहणं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आठव्या वेतन आयोगासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची तात्काळ मदत

Fuel Price Hike : देशात विमान सेवा बंद होणार? एअरलाईन्स अडचणीत, एअर इंडियाचे थेट सरकारला पत्र; जाणून घ्या कारण

Abhishek Bachchan : अभिषेकने खोटी अंगठी घालून केलं होत ऐश्वर्या रायला प्रपोज, बच्चन कुटुंबाच्या लेकावर 'अशी' वेळ का आली?

IPL मध्ये नवा वाद! राजस्थानचा कर्णधार सामना सुरू असताना ओढतोय सिगारेट; व्हिडिओने खळबळ

SCROLL FOR NEXT