Indian Railway Saam Tv
लाईफस्टाईल

Railway Job Alert : रेल्वे लोको पायलट होण्यासाठी किती शिक्षण लागतं? पगार किती मिळतो?

Indian Railway Job : रेल्वेमध्ये सुरुवातीला लोको पायलटची सहाय्यक म्हणून भरती केली जाते.

साम टिव्ही ब्युरो

Railway Jobs :

रेल्वे नेहमीच अनेकांसाठी आकर्षकणाचा विषय असतो. रेल्वे प्रवास, रेल्वे नियम, रेल्वे लोको पायलट या सर्व गोष्टी नेहमीच कुतूहलाच्या असतात. रेल्वेत नोकरी मिळवणे हे देशातील अनेक तरुणांचे स्वप्न आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण रेल्वेत नोकरीसाठी प्रयत्न करतात. ट्रेन ड्रायव्हर म्हणजेच लोको पायलटची भरती कशी केली जाते आणि या पदासाठी कोण अर्ज करू शकतो? याबद्दल अनेकांना माहिती नाही.

लोको पायलटची भरती देखील परीक्षेद्वारेच होते. रेल्वेमध्ये लोको पायलट होण्यासाठी किमान 10वी पास असणे आवश्यक आहे. यासोबतच आयटीआयची पदवी देखील असावी लागते.

पदवी कोणत्याही ग्रेड मेकॅनिकल टेक्निशियन किंवा इलेक्ट्रीशियन ट्रेडमधून असेल तरी चालते. रेल्वेमध्ये सुरुवातीला लोको पायलटची सहाय्यक म्हणून भरती केली जाते. त्यानंतर त्यांना अनुभवाच्या आधारे बढती दिली जाते.

परीक्षा कशी असते?

लोको पायलट होण्यासाठी प्रथम लेखी परीक्षा आणि त्यानंतर प्रशिक्षण अशी प्रक्रिया असते. लेखी परीक्षेत रिझनिंग, करंट अफेअर्स, जनरल नॉलेज, जनरल मॅथेमॅटिक्स या विषयांवरून प्रश्न विचारले जातात. लेखी परीक्षा पास झाल्यास वैद्यकीय आणि प्रशिक्षण होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मालगाडी चालवण्याची जबाबदारी पायलटवर सोपवली जाते. नंतर अनुभवानुसार लोको पायलटला पॅसेंजर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाते. (Latest News Update)

पगार किती मिळतो?

लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलटच्या सुरुवातीच्या पगारात खूप फरक आहे. सुरुवातीला असिस्टंट लोको पायलटला 30,000 ते 35,000 रुपये पगार मिळतो. यानंतर त्याचा अनुभव जसजसा वाढत जातो, तसे त्याला प्रमोशन मिळते आणि पगारही वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT