साम टिव्ही ब्युरो
महागड्या कोचिंग क्लासशिवाय देखील आयएएस अधिकारी बनणे शक्य आहे. त्यासाठी शिस्त, समर्पण आणि धोरणात्मक दृष्टीकोण हवा.
यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता निकष समजून घ्या. परीक्षेचे टप्पे, विषय यांची माहिती घ्या.
अभ्यासक्रमातील विषयांची सर्वसमावेशक प्लानिंग करुन वेळापत्रक तयार करा.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून विश्लेषण करा. परीक्षेचा पॅटर्न आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न समजून घ्या.
ऑनलाइन संसाधनांच्या मदतीने तुम्ही UPSCची चांगली तयारी करू शकता.
यूपीएससी अभ्यासक्रम खूप मोठा आहे, त्यामुळे छोट्या नोट्स बनवल्याने महत्त्वाच्या मुद्यांची उजळणी करण्यात मदत होते.
प्रत्येक विषयासाठी उत्तम पुस्तके वाचा. टॉपर्सनी सांगितलेल्या पुस्तकांची यादी बनवू शकता.
तुम्ही तुमची उत्तरे कशी सादर करता याचा तुमच्या एकूण गुणांवर परिणाम होतो. तुमचे उत्तर लिहिण्याचे कौशल्य वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमितपणे उत्तर लिहिण्याचा सराव करा.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासात सातत्य देखील ठेवा. इतर अनेक गोष्टी अभ्यास सुरु केल्यावर समजत जातील.