Health tips, Weight loss tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

या ड्रायफ्रुट्सचे आहारात सेवन करा,वजन कमी करण्यास होईल मदत

वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करुनही ते कमी होत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : रोज व्यायाम, योग करुन देखील आपले वजन कमी होत नाही. वजन कमी करायला कोणाला आवडत नाही, पण आजकालच्या आहारामुळे ते शक्य होत नाही, त्यामुळे लोक उपवास करतात किंवा व्यायाम करतात तरीही त्याचा परिणाम दिसून येत नाही

हे देखील पहा -

वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करुनही ते कमी होत नाही. आहारात बदल करुनही शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाही. त्यासाठी आपण आपल्या आहारात काही कडधान्यांचा समावेश करतो परंतु, तरी देखील आपली भुक कंट्रोल होत नाही. आपण अशा काही ड्रायफ्रुट्सचा समावेश करणार आहोत ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहिल.

या ड्रायफ्रुट्सनी वजन कमी करा

१. अक्रोडमधे अनेक पौष्टिक घटक असल्यामुळे शरीरासाठी खूप फायदा होतो. यात फॅटी अँसिड, ओमेगा ३, गुड फॅट, अल्फा लिनोलेनिक अँसिड आदी असल्यामुळे वजन कमी (Weight loss) होण्यास खूप मदत होते. आपल्या आहारात अक्रोडाचा नक्कीच समावेश करा ज्यामुळे आपले वजन कमी होईल. यासाठी आपण भिजवलेले अक्रोडही खाऊ शकता.

२. खजूरात खनिजे आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असल्याने ते शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. यात आढळणारी साखर ही नैसर्गिक असल्यामुळे शरीराला हानी पोहोचत नाही. तसेच खाल्ल्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही. यात आढळणारे व्हिटॅमिन (Vitamins) शरीरातील स्टॅमिना वाढवतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

३. रोज बदाम खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. बदामामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. बदामाचे सेवन केल्याने भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. यात अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आदी घटक आढळतात. जे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित ठेवते.

४. अंजीर पचनक्रियेसाठी चांगले आहे. यामध्ये आढळणारे फिसिन नावाचे एन्झाइम पचनक्रिया सुरळित ठेवण्यासाठी मदत होते. तसेच भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच यामध्ये आढळणारी साखर (Sugar) आरोग्याला हानी पोहोचवत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT