पहिल्यांदा जीमला जात असाल तर या चुका टाळा

जीमला जाताना या चुका टाळाव्यात.
These mistakes should be avoided while going to the gym, Fitness tips in Marathi, gym tips for beginners,
These mistakes should be avoided while going to the gym, Fitness tips in Marathi, gym tips for beginners, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नवीन वर्ष सुरु झाले की, आपले नवनवीन प्लान सुरु होतात परंतु काही दिवसांत ते पुन्हा विस्कळीत होतात. त्यातलीच एक जीम. जीमला जाण्याचे वेध आपल्यापैकी बऱ्याच जणांना असतात.

हे देखील पहा -

वजन कमी करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. व्यायाम, जीम आणि त्यासोबत योग्य आहार. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षात जीमला कुलूप लागले त्यामुळे वजन खूप वाढलं आहे. इतका की त्याचा परिणाम आपल्या इतर अवयवांवर होत आहे. अशावेळी वजन कमी करण्यासाठी आपण जिममध्ये जाण्याची सुरुवात करतो परंतु, जीमला गेल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? हे जाणून घेऊया. (These mistakes should be avoided while going to the gym)

या गोष्टी लक्षात ठेवा-

- खरेतर दुसऱ्याला पाहून जिमला जायला सुरुवात करू नका. आपले आरोग्य सुधारण्यासाठी जिमला जा. जिममधे गेल्यानंतर आपल्या शरीराला झेपेल इतकेच वजन उचला. व्यायाम करताना आपले ध्येय निश्चित करा. (Fitness Tips in Marathi)

These mistakes should be avoided while going to the gym, Fitness tips in Marathi, gym tips for beginners,
भांड्यांमधून येणारा कांदा-लसणाचा वास कसा काढाल ?

व्यायाम करताना कोणत्या चुका लक्षात ठेवाव्यात?

व्यायाम करताना आपण अधिकाधिक वजन उचलले पाहिजे असे आपल्याला वाटते. चुकीचा व्यायाम केला तर दुखापत होऊ शकते हे आपण लक्षात ठेवायला हवे. आपण व्यायाम कसा करतोय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यात सुधारणा करा.

व्यायामाच्या आधी आणि नंतर कोणत्या गोष्टी कराव्यात?

सर्व प्रथम आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट असे पदार्थ असायला हवे. जिमला जाण्यापूर्वी १-२ तासा आधी खा, भरपूर पाणी (Water) प्या. जिममध्ये गेल्यावर आधी वॉर्म अप करा. आपल्याला कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी त्याची सुरुवात हलक्या वजनाने करा.

आहार कसा असावा?

आहारातून सर्व पोषक तत्वे मिळायला हवीत. प्रथिने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावीत. प्रथिने, कार्बोहायड्रेट, सर्व जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे, फळे (Fruit), भाज्या, फायबर आणि पाणी पुरेशा प्रमाणात घ्या. आपल्या ध्येयानुसार कॅलरीज घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या फिटनेस सल्लागाराशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com