लाईफस्टाईल

Worst foods for health: 'या' पदार्थांचं सेवन म्हणजे आजाराला निमंत्रण; WHO कडून न खाण्याचा सल्ला!

Worst foods for health: जागतिक आरोग्य संघटनेने काही खाद्यपदार्थांची यादी जारी केली. WHO च्या म्हणण्यांनुसार, हे पदार्थ आरोग्यासाठी सर्वात वाईट आणि हानिकारक ठरू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अयोग्य आहाराच्या सवयीमुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतो. यामुळे जीवनशैलीतील अनेक आजारांचा धोकाही वाढू शकतो. चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे संपूर्ण जगभरात लठ्ठपणा, मधुमेह, आणि इतर आजारांचं प्रमाण वाढू लागतं.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने काही खाद्यपदार्थांची यादी जारी केली. WHO च्या म्हणण्यांनुसार, हे पदार्थ आरोग्यासाठी सर्वात वाईट आणि हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने या पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

ब्रेड

पांढरा मैद्याचा ब्रेड आणि केक तसंच मफिन्स शिवाय इतर बेकरीचे प्रोडक्ट्स आरोग्यासाठी चांगले नसतात. हे तुमच्या ब्लड शुगर आणि इन्सुलिन या दोन्ही पातळी वाढवतं. त्याच वेळी, कार्ब्सचं सेवन केल्याने तुमच्या हृदयाचं आरोग्य बिघडू शकतं.

चिप्स

चिप्स आणि मायक्रोवेव्हमध्ये तयार होणारे पॉपकॉर्न देखील शरीरासाठी हानिकारक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. या सारख्या गोष्टी चवीला चांगल्या लागत असल्या तरीही त्या अजिबात खाऊ नयेत.

मीठ ( अतिप्रमाणात )

मीठाचे सेवन मर्यादित प्रमाणातच केलं पाहिजे. याचं मुख्य कारण म्हणजे यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता अधिक असते. शिवाय यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. सोडियम जास्त असलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमचा लठ्ठपणा वाढण्याचाही धोका असतो.

बर्गर

आजकालच्या तरूणाईला जंक फूड चवीला चांगलं असल्याने प्रचंड आवडतं. मात्र हे पदार्थ तुमच्या शरीरासाठी फारसे आरोग्यदायी नसतात. बर्गरमध्ये ब्रेड, केचप, चीज आणि तळलेली पॅटी असते. या सर्व गोष्टींमध्ये मीठ, तेल असतं जे हृदय, यकृत आणि पचनसंस्थेला हानी पोहोचवता. त्यामुळे हे पदार्थ खाणं टाळावं

पास्ता

लहान मुलांना पास्ता खूप आवडतो. मात्र यामध्ये मैदा, चीज आणि मीठाचं प्रमाण जास्त असतं. जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं. जे तुमचं वजनही वाढवू शकतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT