Janmashtami and Shravan Somwar Fast : जन्माष्टमीच्या दिवशीच श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा? वाचा सविस्तर

Janmashtami and Shravan Somwar on Same Day : दोन्ही महत्वाचे उपवास एकाच वेळी आल्याने उपवास कसा करावा आणि कसा सोडावा याबाबद अनेक व्यक्तींच्या मनात मोठा संभ्रम आहे.
Janmashtami and Shravan Somwar on Same Day
Janmashtami and Shravan Somwar FastSaam TV
Published On

जन्माष्टमी या वर्षी २६ ऑगस्ट २०२४ या दिवशी आली आहे. जन्माष्टमीला भगवान विष्णूंच्या आठव्या अवताराचा म्हणजेतच श्री कृष्णांचा जन्म झाला होता. हिंदूधर्मात जन्माष्टमी सण मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. हा सण संपूर्ण भारतात साजरा करतात. विशेषतः गोपाळकाला उत्सव भारताच्या कोकण भागात मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो.

Janmashtami and Shravan Somwar on Same Day
Lal Krishna Advani : अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या सुपुत्राचा गौरव; CM शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून अडवणींचे अभिनंदन

सध्या श्रावणी सोमवार सुरू आहेत. त्यात उद्याच्या सोमवारी संपूर्ण भारतात जन्माष्टमी सुद्धा साजरी केली जाणार आहे. दोन्ही महत्वाच्या आणि मोठ्या गोष्टी एकाच दिवशी आल्या आहेत. दोन्हींचे उपवास हिंदू धर्मात फार महत्वाचे आहेत. मात्र दोन्ही महत्वाचे उपवास एकाच वेळी आल्याने उपवास कसा करावा आणि कसा सोडावा याबाबद अनेक व्यक्तींच्या मनात मोठा संभ्रम आहे.

जन्माष्टमीला अनेक कृष्ण भक्त उपवास ठेवतात. दुसऱ्या दिवशी दहीकाला झाल्यावर दहीहंडी असलेल्या प्रसादाचे सेवन करुन उपवास सोडला जातो. उपवास केल्याने शरीरावर आणि मानसिकतेवर चांगला परिणाम होतो. मात्र प्रत्येकाच्या उपवास करण्याच्या पद्धती या वेगळ्या आहेत.

जन्माष्टमीला काही लोक निर्जळी उपवास करतात. कृष्ण जन्मापासुन ते दहीहंडीपर्यंत हा उपवास करतात. यात सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठणे, स्नान करुन कृष्ण मंत्राचा जप करणे यास सुरुवात होतो.

त्यानंतर रात्री बारा वाजता कृष्णजन्मा सोहळा साजरा केला जातो. तसेच रात्रभर हा उपवास कायम राहतो. उद्याच्या सोमवारी श्रावणी सोमवार सुद्धा आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारचा उपवास सोडायचा आणि जन्माष्टमीचा उपवास सुद्धा सुरु ठेवायचा असेल तर काय केले पाहिजे याचीच माहिची जाणून घेणार आहोत.

श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना तुम्हाला "आपो वा अशितं अनशितं च ।" या मंत्राचा जप करावा लागेल. "आपो वा अशितं अनशितं च ।" असा जप करून एक घोट पाणी प्या आणि मनात मी श्रावणी सोमवारचा उपवास सोडत आहे असं म्हणा. तसेच तुमचा जन्माष्टमीचा पुढे सुरुच ठेवा. असे केल्याने तुम्हाला दोन्ही उपवास पूर्ण करता येतील.

महत्वाच्या टीप्स

या दिवशी निर्जळी उपवास करणाऱ्यांनी ज्यास्त काम करू नये. त्याने अशक्तपणा येऊ शकतो. जन्माष्टमीला फळांचा आहार करणे उत्तम असते. काही लोक फळव्रत सुद्धा करतात. यात दुधाच्या पदार्थांचे सेवन तुम्ही करु शकता. केळी, डाळींब, सफरचंद असे ताज्याफळांचे सेवन आपण करु शकतो. त्याचबरोबर पनीर, दूध, दही या दुग्धजन्य पदार्थांचेही सेवन केले जाते.

Janmashtami and Shravan Somwar on Same Day
Lal Krishna Advani: भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी झाले भावुक, म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com