Causes of high blood sugar saam tv
लाईफस्टाईल

Causes of high blood sugar: फक्त साखर खाल्यानेच ब्लड शुगर वाढत नाही, तज्ज्ञांनी दिली सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

Does eating sugar alone increase blood sugar: वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, फक्त साखर खाल्ल्याने (Eating Sugar Alone) मधुमेह होत नाही. रक्तातील साखर वाढण्यामागे इतरही अनेक पदार्थ आणि चुकीची जीवनशैली कारणीभूत ठरते.

Surabhi Jayashree Jagdish

  • कोणती औषधे रक्तातील साखर वाढवतात?गोड न खाल्लं तरी साखर वाढू शकते.

  • मैदा, बटाटा हे साखर वाढवणारे पदार्थ आहेत.

  • ताणतणाव आणि अपुरी झोप साखर वाढवतात.

अनेकांना वाटतं की, गोड पदार्थ किंवा मिठाई खाल्ल्यानेच ब्लड शुगर वाढते. पण हे केवळ गैरसमज असून, गोड न खाल्लं तरीही डायबिटीस रुग्णांमध्ये किंवा सामान्य लोकांमध्ये साखरेची पातळी वाढू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दिल्लीतील सीके बिरला हॉस्पिटलच्या आंतररुग्ण विभाग संचालक डॉ. मनीषा अरोरा आणि मुंबईतील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या फिजिशियन व डायबेटोलॉजिस्ट डॉ. आरती उल्लाल यांनी एका वेबसाईटशी बोलताना याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

गोड नसूनही रक्तातील साखर का वाढते?

डॉ. अरोरा यांनी सांगितलं, “हे खूपच महत्त्वाचं असून नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. गोड खाणं म्हणजेच साखरेची पातळी वाढणं असा समज चुकीचा आहे. मैद्याची पोळी, बटाटा, refined carbohydrates यांसारखे हाय-ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नदेखील रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात. त्याचप्रमाणे प्रोसेस्ड फूड, जास्त चरबी असलेले पदार्थ आणि मोठ्या प्रमाणात खाल्लं जाणं हेही कारणीभूत ठरतं.

डॉ. उल्लाल यांच्या मते, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, काही औषधांचं सेवन किंवा इन्सुलिन/डायबिटीसची औषधं वेळेवर न घेणं यामुळेही रक्तातील साखर वाढण्यास मदत होते.

औषधांचा परिणाम कसा होतो?

डॉ. अरोरा म्हणाल्या की, रूमेटॉइड आर्थ्रायटिस, दम्याचा त्रास या आजारांवर दिल्या जाणाऱ्या स्टेरॉइड औषधांमुळे रक्तातील साखर वाढू शकते. त्याचबरोबर काही ॲन्टी-डिप्रेशन औषधं, डिकंजेस्टंट्स आणि गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही परिणाम होतो.

ताणतणाव आणि झोपेची कमतरता

दीर्घकाळ ताण आल्यास शरीरातील कॉर्टिसोल हॉर्मोन वाढतो. हा हॉर्मोन शरीराला धोक्याची स्थिती असल्याचं भासवतो आणि रक्तातील साखर साठवण्यास प्रवृत्त करतो. त्याचप्रमाणे अपुरी झोप घेतल्यासही कॉर्टिसोलचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे इन्सुलिनचा परिणाम कमी होतो, परिणामी साखरेची पातळी वाढते.

व्यायामाचा अभाव आणि आजार

नियमित हालचाल किंवा व्यायाम न केल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतं. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाते. तसंच सर्दी, फ्लू, निमोनिया यांसारख्या संसर्गांदरम्यान शरीर तणावाखाली येतं आणि त्याचा परिणाम साखरेच्या पातळीवर होतो.

शरीरातील नैसर्गिक बदल

पहाटेच्या सुमारास शरीरात ‘dawn phenomenon’ घडतो. म्हणजेच शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी यकृतामधून ग्लुकोज सोडलं जातं. त्यामुळे सकाळी उठल्यावर साखर वाढलेली दिसू शकते.

काही वेळा ‘सोमोगी इफेक्ट’ देखील दिसतो. म्हणजे रात्री रक्तातील साखर खूप घटली तर शरीर साठवलेला ग्लुकोज सोडते आणि सकाळी साखर जास्त दिसते.

महिलांमधील बदल

मेनोपॉजनंतर किंवा हार्मोनल असंतुलनामुळेही महिलांमध्ये इन्सुलिन संवेदनशीलतेत बदल होतो. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार जाणवतात.

डॉ. अरोरा म्हणाल्या, “फक्त गोड खाल्ल्यानेच साखर वाढते हा समज चुकीचा आहे. जीवनशैली, हार्मोन्स, औषधं आणि शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया हे सर्व घटक कारणीभूत असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार, व्यायाम, औषधांचा नियमित आढावा, ताण-तणावावर नियंत्रण आणि सतत तपासणी आवश्यक आहे.”

गोड न खाल्लं तरी रक्तातील साखर का वाढते?

मैदा, बटाटा, ताण, औषधे आणि व्यायामाचा अभाव यामुळे साखर वाढते.

कोणती औषधे रक्तातील साखर वाढवतात?

स्टेरॉइड्स, ऍन्टी-डिप्रेशन्ट्स आणि गर्भनिरोधक गोळ्या साखर वाढवतात.

ताणतणावामुळे साखर का वाढते?

ताणामुळे कॉर्टिसोल वाढून इन्सुलिनचा परिणाम कमी होतो.

सकाळी साखर जास्त का दिसते?

'डॉन फिनॉमिनॉन' मुळे सकाळी साखर वाढलेली दिसते.

महिलांमध्ये साखरेचा चढ-उतार का होतो?

मेनोपॉज आणि हार्मोनल असंतुलनामुळे साखरेचा चढ-उतार होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar: लालछडी...! सईचा हटके अंदाज, Photo पाहतच राहाल

Actress Vannu The Great : लग्नासाठी धर्मांतर केलं, नवरा संसार अर्ध्यात सोडून पळाला; अभिनेत्री रडून रडून बेहाल

Crime News : जमिनीच्या वादातून अपहरण करत हत्या; शहापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

Prajakta Koli: सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळीची मराठीत एन्ट्री; 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम'मध्ये साकारणार खास भूमिका

Maharashtra Live News Update: सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त - छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT