Eating with Hands Saam TV
लाईफस्टाईल

Eating with Hands : चमचा नको हाताने जेवण करा; आरोग्याला मिळणारे 'हे' भन्नाट फायदे तुम्हाला माहितीयेत का?

Ruchika Jadhav

आजकाल वेस्टन कल्चर भारतातही जास्त प्रमाणात वापरलं जातं. अनेक घरांमध्ये, ऑफिसमध्ये विविध ठिकाणी जेवण्याची पद्धत बदलली आहे. व्यक्ती हाताने जेवण करणे म्हणजे अस्वच्छता समजतात आणि चमच्याने जेवण करतात. मात्र तुम्हाला माहितीये का? हाताने जेवण करणे ही फक्त भारतातील परंपरा नसून त्याचे आरोग्यालाही भन्नाट फायदे मिळतात.

आयुर्वेदीक डॉक्टर दिक्षा भवसार सावलिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. आयुर्वेदात हाताने जेवण केल्याने काय फायदे होतात हे त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

हाताने खाणे केवळ स्वच्छच नाही तर तुमच्या इंद्रियांसाठी आणि पचनासाठी देखील फायदेशीर आहे, असं त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, प्रत्येक बोट पाच घटकांपैकी एक घटक दर्शवते.

स्थळ (अंगठा)

हवा (चाफेकळी)

अग्नि (मधले बोट)

पाणी (मरंगळी)

आणि पृथ्वी (करंगळी)

जेव्हा आपण आपल्या हाताने जेवण करतो तेव्हा आपल्या हाताची तोंडाची वेगळी हालचाल होते. यातून आपल्या शरीरातील उर्जा संतुलित राहते. जेव्हा आपण आपल्या बोटांनी आपल्या पदार्थांना स्पर्श करतो तेव्हा आपण आपल्या मेंदूला आज्ञा देतो की, हे जेवण खाण्यासाठी मी तयार आहे. ज्यामुळे आपलं पोट आणि इतर पाचक अवयव पचन प्रक्रियेसाठी तयार होतात, अशी माहिती आयुर्वेदात दिल्याचं डॉक्टर दिक्षा भवसार सावलिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हाताने खाल्ल्याने आपण काय खातो? किती खातो? आणि किती जलद गतीने खातो? या सर्व गोष्टींचा आरोग्यावर परिणाम होतो. हाताने खाल्ल्याने वात, पित्त, कफ यासारख्या आजारांवर देखील मात करता येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT