Side Effects Of Eating Banana Saam Tv
लाईफस्टाईल

Side Effects Of Eating Banana : मायग्रेनपासून मधुमेहापर्यंत त्रस्त असलेल्यांसाठी केळी खाणे हानिकारक !

Side Effects Of Banana : तुम्हाला माहित आहे का की केळी खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते.

कोमल दामुद्रे

Side Effects Of Eating Banana : सर्व ऋतूमध्ये मिळणारे केळी हे फळ अनेकांना खायला आवडते. तसेच केळी खाल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषकघटक केळी मध्ये आढळतात.

फायबर, व्हिटॅमिनस (Vitamins), पोटॅशियम,जस्त केळीमध्ये (Banana) आढळतात. त्यामुळे केळी ऊर्जेचे मजबूत स्त्रोत समजले जाते. केळी खाणे आपल्या आरोग्याला (Health) फायदेशीर असले तरी तुम्हाला माहित आहे का की केळी खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. केळी खाण्याचे शरीराला तोटेही होतात. चला तर मग जाणून घेऊया केळी खाण्याचे तोटे काय आहेत.

1. बद्धकोष्ठता

पोटाच्या समस्येले केळी खाल्याने आराम मिळतो. पण केळीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी केळी खाणे टाळावे.तसेच जर तुम्हाला सारखे पोट फुगणे ही समस्या उद्भवत असेल तर अशा वेळेस केळीचे सेवन करू नयेत.

2. मधुमेह (Diabetes)

मधुमेह रुग्णांसाठी केळी खूप हानिकारक असू शकते. केळीमधील नैसर्गिक साखरेचे प्रमाण ब्लड शुगर लेव्हल वाढवू शकते. यामुळे जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असेल तर केळीचे सेवन करणे टाळावेत.

3. दमा

शरीरातील ऊर्जेसाठी केळी मजबूत स्त्रोत आहे. पण दम्याचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी केळी खूप हानिकारक आहे. दम्याच्या रुग्णांनी जर केळीचे सेवन केले तर त्यांचा दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दम्याचा रुग्णांनी शक्यतो केळीचे सेवन करणे टाळावेत.

4. मायग्रेन

मायकग्रेनच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी केळी खाऊ नयेत. कारण केळी खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते. केळी मध्ये असलेले अमिनो ऍसिड टायरोसिन जे शरीरात टायरामाइनमध्ये रुपांतरित होते. यामुळे मायग्रेनला चालना मिळू शकते.

5. एलर्जी

केळी खाल्याने शरीरावर सूज येते , तर ते एलर्जीमुळे होत असते. त्यामुळे केळीचे सेवन न केलेले चांगले. जर तुम्हालाही केळी खाल्ल्याने या समस्या उद्भवत असतील तर केळीचे सेवन टाळावेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

Reshma Shinde : अभिनेत्री रेश्मा शिंदे आई तुळजाभवानीच्या दर्शनाला, पाहा फोटो

दारूच्या नशेत तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला, ट्रॅकमनने वेळीच बाहेर खेचलं; कर्मचारी रविकुमार यांचं सर्वत्र कौतुक

SCROLL FOR NEXT