Raw Banana Benefits: वजन कमी करण्यासाठी कच्ची केळी फायदेशीर, जाणून घ्या इतर फायदे

कच्च्या केळीचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात.
Raw Banana Benefits
Raw Banana BenefitsSaam Tv
Published On

Raw Banana Benefits: केळीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोकांना केळी पिकलेली आणि कच्ची अशा दोन्ही प्रकारात खायला आवडते. पिकलेल्या केळ्यांप्रमाणेच, कच्च्या केळीचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात.

कच्च्या केळीचा रंग हिरवा असतो. कच्च्या केळ्यामध्ये प्रोविटामिन-ए, व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-सी, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक आणि फेनोलिक कंपाऊंड्स सारखे अनेक गुणधर्म आढळतात. कच्च्या केळीचे सेवन केल्याने पचनशक्ती मजबूत होते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया कच्च्या केळीचे सेवन करण्याचे आरोग्य फायदे.

हे देखील पाहा -

कच्ची केळी खाण्याचे फायदे

पचनशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर - पचनशक्ती मजबूत करण्यासाठी कच्च्या केळ्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण कच्च्या केळीमध्ये फायबर आणि प्रतिरोधक स्टार्चचे प्रमाण आढळते, जे पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करते. तसेच, पचनाच्या समस्यांवर मात करण्यास मदत करते.

Raw Banana Benefits
Aarey Colony: आरेतील मेट्रो कारशेडच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ कॉंग्रेसचं आंदोलन; सरकार विरोधात जोरदार घोषणा

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर - वजन कमी करण्यासाठी कच्च्या केळ्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते . कारण कच्च्या केळीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर कच्च्या केळीचा आहारात नक्की समावेश करा.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर - कच्च्या केळीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण कच्च्या केळीमध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म आढळतात, जे मधुमेहाची समस्या कमी करण्यास मदत करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com