मुंबई: मुंबईतील आरेचे जंगल (Aarey Colony) हे भविष्यातही जंगलच रहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करावा या मागण्यासाठी कॉंग्रेसतर्फे (Congress) आंदोलन आज करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानापासून काही अंतरावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. कॅडबरी जनक्शन येथे काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी आंदोलन केलं यावेळी पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. (Save Aarey Protest News)
हे देखील पाहा -
या पार्शवभूमीवर कॅडबरी जंक्शन येथे काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी कॅडबरी जंक्शन येथे आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या सर्व आंदोलनकर्त्यांना वागळे इस्टेट पोलीस स्थानकात नेण्यात आलं. पोलीस स्थानकात आंदोलनात सहभागी असलेल्यांची नोंद करुन नंतर त्यांना सोडण्यात आलं. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाही दिल्या. तसेच सरकारने निर्णय बदलला नाहीतर आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
मुंबईचं फुप्फुस असलेल्या आरे कॉलनीमधील (Aarey Colony) हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रचंड संख्येने वृक्षतोड केली गेली होती आणि आता पुन्हा झाडं तोडण्यात येणार आहे. याला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध आहे. आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे आता आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आरे कारशेडवर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मेट्रोचे काम थांबले होते. आरे कारशेडला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कारशेडवर स्थगिती दिली होती. मात्र, शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात येताच पुन्हा हा निर्णय बदलण्यात आला आणि मेट्रोचे कारशेड आरेतच होणार असं या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यामुळे आता पर्यावरणप्रेमींसह अनेक संघटना आणि राजकीय पक्ष मेट्रो कारशेडचा विरोध करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.