Diabetes Care Tips : मधुमेह हा एक असा आजार आहे ज्याला इतर समस्यांचे मूळ मानले जाते. मधुमेह झालेल्या व्यक्तींमध्ये हार्ट डीजीज, किडनी डीजीज यांसारख्या अनेक समस्या पाहायला मिळतात. यामधीलच एक कारण म्हणजे पायांमध्ये तीव्र दुखणे, या कारणामुळे मधुमेह झालेल्या व्यक्तींचे चालणे फिरणे सुद्धा कठीण होऊन बसते.
शरीरामध्ये ब्लड शुगर (Sugar) लेवल वाढल्यानंतर फुटपेन होणे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. परंतु तुम्ही काही घरगुती उपाय वापरून या समस्येला दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात हे उपाय नेमके कोणते आहे.
ब्लड शुगर कमी करा -
मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवणे ही आरोग्याची (Health) पहिली पैज असते. याशिवाय कोणत्याही प्रकारची समस्या दुर करण्याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. यासाठी तुम्ही तुमच्या लाइफस्टाइलमध्ये आणि फूड हॅबिट्समध्ये बदल घडवून आणला पाहिजे.
तुमच्या खाण्यापासून ते एक्सरसाइजपर्यंत आणि झोपेचा टाईम सुद्धा फिक्स करून घ्या. परंतु यामध्ये जास्त प्रमाणात बदल घडवून आणू नका. त्याचबरोबर जास्त गोड आणि ऑईली फुड्स पासून लांबच राहा, कारण की यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात.
फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवा -
एक्सरसाइज केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊन जातात. मधुमेह झालेल्या व्यक्तींना देखील ही गोष्ट लागू होते. जर तुम्ही दररोज व्यायाम केला तर तुमच्या पायांचे दुखणे हळूहळू कमी होईल, सोबतच हळूहळू सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होईल. अशा पद्धतीने तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुधारणा होते आणि शुगर लेवल सुद्धा कंट्रोलमध्ये राहते.
दिवसभरातील कामांमधुन फ्री झाल्यावर, व्यायामासाठी सुद्धा थोडा वेळ द्या. जर तुम्हाला हे शक्य होत नसेल तर, तुमच्या आसपास असलेल्या मैदानामध्ये किंवा पार्कमध्ये जॉगिंग करा. असं केल्याने तुमच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारेल.
गरम पाण्याचा वापर करा -
गरम पाण्याच्या मदतीने पायांना होणाऱ्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. तुम्ही तुमचे पाय धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा, किंवा अंघोळीसाठी सुद्धा तुम्ही गरम पाण्याचा वापर करून अनेक प्रकारचे फायदे घेऊ शकता.
पायांची काळजी घ्या -
जेव्हा तुमच्या पायांमध्ये तीव्र दुखायला लागेल, तेव्हा तुम्ही या गोष्टीचा शोध घ्या की, आपले काही चुकत तर नाही आहे ना. तुम्ही तुमच्या पायांची काळजी घ्या, यासाठी तुम्हाला तुमच्या पायांची कायम काळजी घ्यावी लागेल आणि नखांना देखील कापून स्वच्छ ठेवावे लागेल.
रात्री झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर हे पडताळून पहा की, तुमचे पाय सुजले तर नाही आहेत ना ? मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी न्यूरोपैथिक ट्रीटमेंट अत्यंत फायदेशीर असते. ज्यामध्ये बूट आणि चप्पलच्या मदतीने दुखणे दूर केले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.