
Leaves For Diabetes : मधुमेह आरोग्याचे योग्य काळजी घेणे खूप गरजेचे असते. या रोगामुळे त्यांना इतर आजारांचा देखील सामना करावा लागतो त्यामुळे त्यांचे योग्य जीवनशैली असणे आवश्यक असते.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते त्यासाठी त्यांनी योग्य आहार फॉलो करून ब्लड लेवल शुगर कंट्रोल मध्ये आणू शकतात. तसेच त्यांच्या आहारात या काही पानांचा समावेश करून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकतात.
तुमच्या रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण वाढत असेल तर तुम्ही या पानाच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकता. याने तुमच्या आरोग्यालाही (Health) त्याचा फायदा होईल चला तर मग जाणून घेऊया या पानांविषयी माहिती.
1. आंब्याची पाने
आंब्याच्या पानाचा उपयोग करून तुम्ही रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकता. आंब्याच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म आढळतात त्यामुळे याने तुमच्या आरोग्य सुधारण्यास मदत होईल. फायबर,पेक्टीन, व्हिटॅमिन (Vitamins) सी हे पोषक घटक आंब्याच्या पानात असतात. दहा ते पंधरा आंब्याचे पाने पाण्यात उकळून ते पाणी रात्रभर तसेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी गाळून त्या पाण्याचे सेवन करा त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
2. कडुलिंबाचे पाने
कडुलिंबाची पाने जरी पडू लागत असेल तरी याचे आरोग्याला अनेक फायदे (Benefits) होतात. या पानांमध्ये अँटी-व्हायरल आणि फ्लेवोनाईटस हे संयुगे आढळतात.त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास हे उपयुक्त ठरतात.कडूलिंबाचे पाने वाळवून मिक्सरमध्ये बारीक पावडर करा रोज एक चमचा या पावडरचे सेवन करा.याने तुमचा मधुमेहाचा त्रास कमी होईल.
3. कढीपत्ता
कढीपत्ता हा सहज उपलब्ध होतो त्यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रित करण्यासाठी हा खूप सोपा उपाय आहे त्यासाठी फक्त रोज सकाळी मूठभर कढीपत्ता चघळला पाहिजे.या पानांचा मधुमेहावर चांगला परिणाम होतो.
4. मेथीचे पाने
मेथीच्या भाजीचे आपल्या आरोग्याला खूप फायदे होतात. मधुमेह रुग्ण आपल्या आहारात मेथीच्या पानाचा समावेश करून ब्लड शुगर लेवल नियंत्रित करू शकतात. मेथीची भाजी किंवा मेथीचा पराठा असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मेथीच्या पानाचे बनवून तुम्ही सेवन करू शकता. तसेच तुम्ही इतर ऋतूमध्ये कोथिंबीर चा वापर करू शकता.
5. पेरूची पाने
पेरूच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि अँटिऑक्साइड व इतर जीवनसत्व आढळतात. पेरूची पाने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असतात परंतु या पानाचे अतिसेवन करणे टाळले पाहिजे.पेरूची पाने तुम्ही पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता त्याचा मधुमेहावर चांगला परिणाम होईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.