Diabetes Control Tips : लग्नसराईत मधुमेहींच्या रुग्णांनी अशाप्रकारे करा सेट करा डाएट प्लान, सतत वाढणार नाही तुमची शुगर

मधुमेह या आजारांने प्रत्येक वयोगाटातील लोकांना विळखा घातला आहे.
Diabetes Control Tips
Diabetes Control TipsSaam Tv

Diabetes Control Tips : सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम दिसून येत आहे. या आनंदाच्या क्षणी प्रत्येक कुटुंब एकत्र येतच पण त्यात अनेक गोष्टी अशा असतात ज्या आपल्या हातात नसतात. त्यातील एक मधुमेह.

मधुमेह या आजारांने प्रत्येक वयोगाटातील लोकांना विळखा घातला आहे. सध्या भारतात सर्वत्र लग्नसराईचा हंगाम असल्याने नृत्‍याचा सराव, विवाहाच्‍या तयारीची लगबग आणि अनेक प्रसंगी साखर-युक्‍त मिठाई व स्‍नॅक्‍सचे प्रमाणात सेवन केले जाते.

Diabetes Control Tips
Diabetes Control Tips : ब्लड शुगर लेव्हल नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा!

उत्‍सवाचा आनंद घेणे आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवणे यामध्‍ये योग्‍य संतुलन राखण्यासाठी आपल्या रक्तातील साखर अचानक वाढते अशावेळी रक्तातील साखर कमी करण्यासाठी आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया

मुंबईतील कन्‍सल्टिंग फिजिशियन, डायबेटोलॉजिस्‍ट, क्लिनिकल कार्डियोलॉजिस्‍ट व क्रिटीकल केअर स्‍पेशालिस्‍ट डॉ. विशेष अग्रवाल म्हणतात आनंदी प्रसंगांदरम्‍यान रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास विसरु नका. जे आपल्याला नियमित चालण्याने देखील करता येऊ शकते.

Diabetes Control Tips
Diabetes Control Tipscanva

सध्या बाजारात (Market) असे अनेक उपकरणे ज्यांमुळे आपण रक्तातील साखर आपण सहज मोजू शकतो. तुम्‍ही विवाहाच्‍या ठिकाणी देखील रिअल-टाइममध्‍ये रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवू शकतात. कन्टिन्‍युअस ग्‍लुकोज मॉनिटरिंग डिवाईसेस या पातळ्या जास्‍त किंवा कमी होण्‍याबाबत माहिती देतात, ज्‍यामुळे तुम्‍ही त्‍वरित सुधारणा करू शकता आणि मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करू शकता.

लग्न प्रसंगात नातेवाईक प्रत्‍येकवेळी आपलं तोंड गोड करतात तरी यात आरोग्‍यदायी राहण्याचा प्रयत्न करा, विशेषत: मधुमेह (Diabetes) असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी हा खडतर काळ ठरू शकतो. त्‍यांच्‍यासाठी मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍याकरिता आरोग्‍यदायी अन्‍नपदार्थांचे सेवन करायला हवे.

अशावेळी आपल्याला समोसा, गुलाबजामुन व लाडूचे मोठ्या प्रमाणात आव्हान ठरु शकते. पण याचा अर्थ असा नाही की, विवाहाच्‍या (Marriage) बुफे जेवणामध्‍ये, तसेच विवाहापूर्वी होणाऱ्या कार्यक्रमांमध्‍ये असे कोणतेही अन्‍न नाही, जे तुम्‍ही सेवन करू शकत नाही.

स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे लक्ष देण्‍यासोबत लग्‍नसराईचा आनंद घेऊ शकता याबाबत मधुमेह-अनुकूल सूचना पुढीलप्रमाणे:

1. कृती आराखडा तयार करा :

तुम्ही विवाहासाठी दुसऱ्या शहरात जात असाल, तर या काळात तुमच्या औषधांचे वेळापत्रक, आहार आणि जीवनशैली कशी व्यवस्थापित करावी याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी आगाऊ सल्‍लामसलत करा. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कृती आराखडा तयार ठेवा. तुम्हाला आवश्यक असलेली औषधे तुमच्या प्रिस्क्रिप्शनसह घेऊन जा.

Diabetes
Diabetes canva

2. मदत मिळवा :

तुमच्या डायबिटीस केअर नित्‍यक्रमाचे योग्य प्रकारे पालन करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणार्‍या कोणत्याही मदतीबाबत विवाहाला उपस्थित राहणारे मित्र आणि कुटुंबियांना माहिती सांगा.

3. विवाहाच्‍या दिवशी तयार रहा:

विवाहाच्या दिवसाची सुरुवात व्यायाम किंवा योगाने करा, ज्यामुळे तुमची रक्तातील शर्करेची पातळी कमी होऊ शकते, कॅलरी बर्न होऊ शकतात आणि तुमची भूक नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. विवाहाला जाण्यापूर्वी कमी कार्बोहायड्रेट, उच्च फायबर स्नॅक सेवन करा. काही काजू किंवा आरोग्यदायी स्नॅक सोबत घेऊन पुढील नियोजन करा.

Diabetes Control Tips
Diabetes Health Tips : हिवाळ्यात ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी, मधुमेहांनी 'या' टिप्स फॉलो करा

4. मधुमेह-अनुकूल आहाराचा अवलंब करा :

विवाहाच्‍या वेळी तुमच्‍या ताटामध्‍ये सलाड किंवा स्‍टार्च नसलेली भाजी आणि एक-चतुर्थांश धान्‍य व स्‍टार्चचा समावेश करा. तळलेल्या कोणत्याही पदार्थांऐवजी बेक केलेले, भाजलेले किंवा शॅलो फ्राय पदार्थ निवडा. मिष्टान्नासाठी फळ-आधारित किंवा शर्करा-मुक्त पदार्थांचे सेवन करा.

5. मनावर ताबा ठेवा:

मिठाई किंवा केकचा आस्‍वाद घ्‍यायचा असेल तर कमी प्रमाणात सेवन करा. तुम्‍हाला पाहिजे असल्‍यास काही प्रमाणात मद्यपान देखील करू शकता आणि नियमितपणे पाणी पित उत्तमरित्‍या हायड्रेटेड राहू शकता.

6. हालचाल करा:

नियोजित प्रमाणापेक्षा थोडे जास्‍त खाल्‍ले किंवा प्‍यायले तर शारीरिक हालचाल तुमच्यासाठी लाभदायी ठरु शकते. तुम्‍ही नृत्‍य करू शकता. तुम्‍ही योग्‍य आहार सेवन करत असला तरी प्रवास, तणाव व झोपेचे अनियमित वेळापत्रक यामुळे रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाणामध्‍ये चढ-उतार होऊ शकतो. डायबिटीस केअर प्‍लानचे पालन करत तुम्‍ही धमाल करण्‍यासोबत आरोग्‍यावर नियंत्रण ठेवू शकता. आनंद साजरा करायला विसरू नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com