Health Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : खरंच की, काय ? उन्हाळ्यात 'हा' लाडू खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका होईल कमी, तर डोळ्यांचे आरोग्यही सुधारेल !

Summer Health : हिवाळा जाऊन उन्हाळा येणार येतो त्यासोबत ऋतू बदलामुळे काही आजार देखील येतात.

कोमल दामुद्रे

Health Tips : आपण अनेक प्रकारचे लाडू सणवारात खातच असतो. पण नेहमीच सर्वाधिक पौष्टिक असणारा लाडू हा राजगिरा ओळखला जातो. राजगिराचा लाडू आणि राजगिराची भाजी ही फक्त हिवाळ्यातच मिळते. हे एक प्रकारचे सीझनल फूड आहे.

मार्च-एप्रिल नंतर खूप गर्मी वाढते. उन्हाळ्यात याचा अस्वात घेता येत नाही. दुपारी तापमान साधारण असते आणि रात्री गुलाबी थंडी असते. हिवाळा जाऊन उन्हाळा येणार येतो त्यासोबत ऋतू बदलामुळे काही आजार देखील येतात. यात सर्दी (Cold), खोकला, ताप यांचा समावेश आहे.या वरील उपाय म्हणजे राजगिऱ्याचा लाडू. जाणून घेऊया त्याचे काही फायदे (Benefits)

1. दृष्टीसाठी उपयुक्त (व्हिटॅमिन ए )

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डोळ्यांचा (Eye) आजार (Disease) होतो. त्यामुळे रोज व्हिटॅमिन ए ची गोळी खावी लागते. परंतु, गोळ्या खाणे कोणालाच आवडत नाही. जर गोळ्या ऐवजी लाडू दिला तर ते सगळ्यां आवडते. राजगिरामध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे. राजगिऱ्यामध्ये अमिनो अॅसिड असते. यामुळे डोळ्याची दृष्टी तर वाढते त्याचबरोबर ब्लड वेस्लसला देखील फायदेशीर आहे. हे डोळ्यातील रेटिना आणि मसल मजबूत करते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते. डोळ्यांना इन्फेक्शन होत नाही.

2. राजगिऱ्याचे सेवन कसे करायचे ?

राजगिराचे लाडू किंवा चिक्की बनवावी आणि याचे सेवन दुधासोबत करावे. दूध हे शरीराचे तापमान नियंत्रत ठेवते. असे गरजेचे नाही की तुम्ही राजगिरा सोबतच दूध घ्यावे. दिवसभरात तुम्ही कधीही दूध घेऊ शकता. राजगिराची हिरवी भाजी हे खूप गुणकारी आहे.यामध्ये हिमोलोबिन असते. याचे सेवन हिवाळ्यात केले पाहिजे. राजगिरामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर दूध आणि राजगिराचे सेवन करावे.

3. कॉलेस्ट्रॉल

जास्त कॉलेस्ट्रॉल हे शरीरासाठी घातक आहे. जास्त कॉलेस्ट्रॉल म्हणजे आजारांना आमंत्रण होय.वाढते कॉलेस्ट्रॉल पचनसंस्था आणि रक्ताभिसरण संस्था धमनीमध्ये अडथळे निर्माण करते. जर योग्य प्रमाणात फायबरचे पचन झाल्यास या समस्या निर्माण होत नाही. राजगिरामध्ये खूप फायबर असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवता येते.

4. राजगिऱ्यात अजून एक गुण म्हणजे यात पोटॅशियम असते.

पोटॅशियम आणि फायबरमुळे धमनी आणि शिरा यातील दाब कमी करतो आणि लवचिकता निर्माण करतो. यामुळे हार्ट अटॅक या सारख्या समस्या निर्माण होत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT