Cancer Risk google
लाईफस्टाईल

Cancer Risk: भेसळयुक्त चणे खाताय? सावधान! कॅन्सर होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

Adulteration: दिल्लीतील बाजारात मिळणाऱ्या भाजलेल्या चण्यांमध्ये धोकादायक ऑरामाइन ओ रंगद्रव्य आढळल्याने कॅन्सरचा धोका वाढल्याची तज्ज्ञांची सूचना. चण्यांची गुणवत्ता तपासूनच सेवन करण्याचा सल्ला.

Sakshi Sunil Jadhav

  • दिल्लीतील भाजलेल्या चण्यांमध्ये धोकादायक ऑरामाइन ओ रंगद्रव्य आढळले.

  • या रसायनामुळे किडनी, लिव्हर आणि ब्लॅडरला मोठे नुकसान होऊ शकते.

  • दीर्घकाळ सेवन केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो.

हिवाळ्यात भाजलेले चणे खाण्याची सवय अनेकांना असते. मात्र अलीकडे समोर आलेल्या एका गंभीर खुलाशामुळे लोकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोणतेही पदार्थ खाताना त्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. कारण दिल्लीतील अनेक बाजारपेठांमध्ये मिळणाऱ्या भाजलेले चण्यांमध्ये 'ऑरामाइन ओ' नावाच्या धोकादायक इंडस्ट्रियल डाईची भेसळ आढळून आली आहे. हीच रासायनिक रंगद्रव्ये कपडे आणि लेदर रंगवण्यासाठी वापरली जातात आणि खाद्यपदार्थात त्यांचा वापर आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

दिल्लीतील अनेक व्यापारी भागांतून घेतलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता सुमारे 40 टक्के नमुन्यांमध्ये या रसायनाची उपस्थिती आढळली. यानंतर FSSAI आणि अन्न सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत 15 एफआयआर दाखल केले असून सुमारे 50 विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. काहींवर मोठ्या दंडाची कार्यवाहीही करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हीही भुने चणे खात असाल तर सावध होणे गरजेचे आहे, कारण या भेसळयुक्त चण्यांमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, ऑरामाइन ओ हे एक सिंथेटिक पिवळे रंगद्रव्य आहे. याचा खाद्यपदार्थांमध्ये वापर करण्यास संपूर्ण बंदी आहे. हे पाण्यात सहज विरघळते आणि चण्यांना आकर्षक पिवळा रंग व कुरकुरीतपणा देते. मात्र WHO च्या इंटरनॅशनल कॅन्सर रिसर्च एजन्सीनुसार हे रसायन कॅन्सर निर्माण करणारे पदार्थांच्या यादीत आहेत. शरीरात गेल्यानंतर ते सर्वप्रथम किडनीला, नंतर लिव्हरला आणि शेवटी ब्लॅडरला हानी पोहोचवतं. बरेच दिवस सेवन केल्यास नर्व्हस सिस्टमही प्रभावित होते. त्याने चक्कर येणे, थकवा, डोकेदुखी आणि उलटी यासारखी लक्षणे दिसू शकतात. मुलं, गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींसाठी ही भेसळयुक्त खाद्य पदार्थ जास्त धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

अनेक तज्ज्ञांनी या चण्यांच्या धोकादायक परिणामांबाबत इशारा देत सांगितले की लोक घरच्या घरीही खरे आणि भेसळयुक्त चणे ओळखू शकतात. चणे काही मिनिटे पाण्यात भिजवून ठेवले असता जर पाणी पिवळे झाले किंवा चणे रंग सोडू लागले तर ते भेसळयुक्त असल्याचे समजावे. अस्सल चणे किंवा डाळ हे पाण्यात हळूहळू खाली जातात, तर नकली चणे पटकन खाली जातात आणि रंग सोडतात. शक्यतो ओळखीतल्या दुकानदारांकडून किंवा ब्रँडेड उत्पादनांचीच खरेदी करावी. चण्यांमध्ये रासायनिक वास, चव किंवा रंग आढळल्यास त्यांचे सेवन तात्काळ थांबवावे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT