Pre Workout Food
Pre Workout Food Saam Tv
लाईफस्टाईल

Pre-workout Food : प्री-वर्कआउटपूर्वी हे पदार्थ खा, व्यायाम करताना होईल फायदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

What to eat before a workout for energy : व्यायाम करण्याआधी नेमके काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही हा प्रश्न नेहमीच वर्कआऊट करणाऱ्यांना पडतो. तेव्हा आज आम्ही तुमच्यासाठी असे काही पदार्थ घेऊन आलो आहोत जे प्री-वर्कआऊट फूड म्हणून प्रसिध्द आहे.

व्यायाम करण्याच्या काही तासांआधी अनेक लोक पौष्टिक आहार (Diet) करण्याचा सल्ला देतात. यामागचे कारण वर्कआऊट (Workout) करताना ताकद टिकून राहाण्यासाठी होतो. पण व्यायामाआधीच्या पौष्टिक आहाराला निवडताना बऱ्याचदा लोक गोंधळतात. नेमके कोणत्या पदार्थांचे सेवन करणे योग्य ठरते? त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे काही खास प्री वर्कआउट पदार्थ सांगणार आहोत ज्यांना तुम्ही हमखास आपल्या प्री वर्कआऊट आहाराच्या योजनेत सामिल करु शकता.

कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?

बऱ्याचदा खेळाडू आणि आहारतज्ज्ञ व्यायामाआधी हायकार्बोहायड्रेट असलेले पदार्थ किंवा जेवणाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. कार्बोहायड्रेट्स दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे साधे कार्बोदके आणि दुसरे जटिल कर्बोदके. साधी कर्बोदके लवकर पचतात आणि लवकर व अधिक काळासाठी ताकद टिकवून ठेवण्यात मदत करतात. तर जटिल कर्बोदके हळूहळू ताकद देतात.

व्यायामाच्या आधी काय खावे?

1.केळी -

जेव्हाही जिम (Gym) आणि व्यायामाची गोष्ट निघते तेव्हा लोक केळं खाण्याचा सल्ला दिला जातो. केळ्यामध्ये साधी कार्बोदके असतात जी लवकर पचतात आणी ताकद देतात. तुम्ही व्यायामाच्या 1 तासाआधी केळ्याचे सेवन करू शकता. एका केळ्यामध्ये 100 ते 110 कॅलरीज असतात.

2. ओट्स -

ओट्स प्री वर्कआऊट आहारासाठी एक उत्तम पदार्थ आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. पण ती जटिल कर्बोदके असल्यामुळे त्यांना व्यायामाच्या 1.5 तास आधी 40 ग्राम ओट्स तास घेणे योग्य ठरेल.

3. दह्यासहित केळी -

दही आणि केळी व्यायामाच्या 1 तास आधी घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. हे पचनशक्ती वाढवते आणि शरीराला ऊर्जा देते.

4. सफरचंदाचा शेक -

सफरचंदाचा शेक हा प्री-वर्कआउट मध्ये घेतला जाणारा एक उत्तम पदार्थ आहे. यात चांगल्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि आवश्यक अमिनो आम्ल असतात. हे बनवण्यसाठी तुम्हाला एक केळं आणि 150 ml दूध गरजेचे असते. केळी आणि दुध मिक्सरला लावून त्याचा शेक तयार करु शकता आणि व्यायामाच्या एक तास आधी घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivali Crime News : पती- पत्नीच्या भांडणात गमावला जीव; डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोघांची हत्या

Today's Marathi News Live : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

Delhi News: मोठी बातमी! दिल्लीत १५ टन बनावट मसाले जप्त; भेसळीत ॲसिड अन् लाकडी भुशाचा समावेश

Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास काय करणार? कंगना रणौतने सांगितला पुढील प्लान

बुलढाणा : 'डीजे' बंदीनंतर मंगल कार्यालय, लाॅन्ससाठी पाेलिसांची नियमावली; जाणून घ्या सूचना

SCROLL FOR NEXT