Roasted Garlic Benefits saam tv
लाईफस्टाईल

Roasted Garlic Benefits: रोज सकाळी उठल्यावर खा भाजलेला लसूण; रक्तवाहिन्यांच्या कोपऱ्यातूनही साफ होईल घाणेरडं साचलेलं कोलेस्ट्रॉल

Health Benefits of Garlic: भाजलेला लसूण खाल्ल्याने पचनक्रिया, रोगप्रतिकारशक्ती आणि हृदयाच्या आरोग्याला कसा फायदा होऊ शकतो? गॅस, पोटफुगी, सांधेदुखी आणि थकवा यांसाठी भाजलेल्या लसणाचे संभाव्य फायदे तसेच तो तयार करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

अनेक जण सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचा सल्ला देतात. लसूण खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, असं म्हटलं जातं. काही जण लसूण आणि मध एकत्र खाण्याचा सल्लाही देतात. या दोन्हीच्या मिश्रणाने सर्दी तसंच खोकला आणि घशातील खवखव कमी होण्यास मदत होते, असं मानलं जातं. पण तुम्ही कधी भाजलेला लसूण खाल्ला आहे का?

कच्चा लसूण चवीला तिखट आणि थोडा कडवट असतो. त्यामुळे अनेकांना तो खायला आवडत नाही. पण काही तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, लसूण भाजल्यानंतर त्याची चव बदलते. तो खायला अधिक चांगला लागतो. भाजलेला लसूण रोजच्या आहारात घेतल्यास शरीराला काही फायदे मिळू शकतात. जाणून घेऊया भाजलेली लसूण खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात.

पोटाच्या त्रासापासून मिळू शकतो आराम

अनेकांना गॅस, पोटात कळ येणं आणि पोट फुगण्याचा त्रास होतो. अशा वेळी भाजलेला लसूण खाणं फायदेशीर ठरू शकतं, असं सांगितलं जातं. भाजलेली लसूण कच्च्या लसणाच्या तुलनेत खायला हलका असतो. त्यामुळे पचनाला मदत होऊ शकते आणि पोटाचा त्रास कमी होण्यास हातभार लागू शकतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत

बदलत्या हवामानामुळे अनेकांना वारंवार सर्दी, खोकला किंवा इतर आजार होतात. अशा वेळी शरीराची रोगांशी लढण्याची ताकद चांगली असणं गरजेचं आहे. भाजलेल्या लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराचं संरक्षण करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

आजकाल कमी वयातही अनेकांना हृदयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत हृदयाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. भाजलेली लसूण खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका कमी होण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लसूण फायदेशीर मानला जातो.

थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत

दिवसभर काम केल्यानंतर अनेकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी भुना लसूण खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते असं मानलं जातं. यामुळे आळस कमी होण्यासही मदत होऊ शकते. पुरुषांसाठीही भाजलेली लसूण फायदेशीर मानला जाते.

सांधेदुखी आणि गुडघेदुखीमध्ये फायदा

वाढत्या वयाबरोबर अनेकांना सांधे आणि गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. लसणामध्ये सूज कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. यामुळे सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांना भाजलेला लसूण खाण्याने भरपूर फायदा होऊ शकतो.

भाजलेला लसूण कसा तयार करायचा आणि कसा खायचा?

  • भाजलेला लसूण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. यासाठी पुढील गोष्टी करा.

  • लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या घ्या.

  • त्या तव्यावर हलक्या भाजून घ्या. तुम्ही थेट आचेवरही लसूण भाजू शकता.

  • लसणाची साल थोडी काळी पडू लागली की तो आचेवरून काढून घ्या.

  • त्यानंतर लसणाच्या पाकळ्या खाऊ शकता. चव वाढवण्यासाठी त्यावर थोडं काळं मीठ किंवा मधाचा एक थेंब टाकू शकता.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'रडीचा डाव' खेळणं बंद करा! गोकुळवरून राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; म्हणाले, "आता विरोधकांचा काळ..."

Maharashtra News Live Update: माणगावमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता

Breaking News : माजी खासदारावर गुन्हा दाखल, नाशिकमधील 'त्या' गाजलेल्या प्रकरणात कारवाई

आई-वडिलांमधील तडजोडीमुळे मुलीचा पोटगीचा हक्क संपत नाही; मुंबई कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वाचा नेमकं काय घडलं?

Beed : बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या वैभवचा मृतदेह आढळला, बीडमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT