Potato crispy  Saam TV
लाईफस्टाईल

Potato crispy : नाश्त्याला बनवा चटपटीत आणि कुरकुरीत पोटॅटो क्रिस्पी; वाचा रेसिपी

Potato crispy Recipe : नाश्त्याला तसेच लहान मुलांना टिफीनध्ये रोज नवीन आणि झटपट तयार होईल असे काय बनवावे असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. त्यामुळे आज पोटॅटो क्रिस्पीची रेसिपी जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

दुपारचं जेवण झालं तरी देखील 4 किंवा 5 वाजता आपल्याला भूक लागते. ही हलकी फुलकी भूक भागवण्यासाठी प्रत्येकाला स्नॅक्स हवं असतं. अशात बाहेरचे तळलेले वेफर्स आणि विविध पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आज घरच्याघरी एक चविष्ट स्नॅक्स रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी अगदी सोपी आहे.

आज आम्ही तुम्हाला पोटॅटो क्रिस्पी कशी बनवायची याची माहिती सांगणार आहोत. ही रेसिपी इतकी टेस्टी आहे की तुम्हाला सतत याची चव चाखावी वाटेल. चला तर मग 10 मिनिटांत तयार होणारी रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य

बटाटे

काळी मिरी पावडर

मिठ

तेल

लाल मिरची पावडर

धने पावडर

जिरे पूड

लिंबाचा रस

कृती

सर्वात आधी एका प्लेटमध्ये बटाट्याच्या साली काढून घ्या. साल काढल्यावर बटाटे पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तसेच सर्व बटाट्याचे बारीक आणि मध्यम आकाराचे काप करून घ्या.

आता काळी मिरी घ्या. काळी मिरी मिक्सरला थोडी बारीक करून घ्या. तुम्ही काळी मिरी खलबत्यात सुद्धा कुटून घेऊ शकता.

त्यानंतर लाल मिरची आणि त्यात थोडे धने टाकून हे देखील मिक्सरला बारीक वाटून घा.

तसेच घरात असलेले जिरे थोडे भाजून घ्या. त्यानंतर जिरे देखील मिक्सरला बारीक करून घा.

सर्व काही बारीक झाल्यावर एका वाटीत सर्व मसाले मिक्स करून घ्या. तसेच एका वाटीत थोडे तेल घ्या आणि त्यात हे मसाले आणि मीठ टाकून घ्या.

त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवा. पॅन गरम झाले की त्यावर मसाल्याच्या तेलात एक एक बटाटा बुडवून ठेवा आणि भाजून घ्या.

बटाटे भाजत असताना यावर जास्तीचे तेल टाकण्याची गरज नाही. अशा पद्धतीने तयार झाले

पोटॅटो क्रिस्पी ही रेसिपी अगदी 10 मिनिटांत सुद्धा तयार होते. तसेच लहान मुलांना खाऊसाठी देखील तुम्ही हे टिफीनमध्ये देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT