लाईफस्टाईल

Facial Hair Removal: घरच्या घरी चेहऱ्यावरील बारीक केस कमी करण्यासाठी सोपे उपाय, चेहरा होईल ग्लोइंग

Upper Lip Removal: घरच्या घरी चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठी गव्हाचे पीठ, बेसन, मध-साखर, पपई व बटाट्याचे नैसर्गिक उपाय प्रभावी ठरतात. हे उपाय त्वचा मऊ ठेवून रसायनांशिवाय केस कमी करतात.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लग्न, साखरपुडा, हळद, बर्थडेची गडबड प्रत्येकाच्या घरात सुरू आहे. महिलांना या सगळ्या गडबडीत पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही. त्यात थंडीमुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. स्कीन रफ होते, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, पिंपल्स येतात. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावरचा ग्लो निघून जातो.

काही महिलांना आयब्रो आणि अप्पर लिप्समुळे ही चेहऱ्याचा आकर्षकपणा गेल्यासारखं वाटतं. बाहेर जाण्यापूर्वी पार्लरची धावपळ, वारंवार केस येणे आणि केमिकलयुक्त ट्रिमर्सची झंझट यामुळे अनेकांना अस्वस्थता जाणवते. पण भारतीय घरांमध्ये आजही असे अनेक पारंपरिक उपाय आहेत, जे पिढ्यानपिढ्या वापरले जातात आणि चेहऱ्यावरचे केस नैसर्गिकरीत्या कमी करण्यात प्रभावी ठरतात. पुढे आपण याबद्दल टिप्स जाणून घेणार आहोत.

गव्हाचे पीठ, हळद आणि तूप

गव्हाच्या पिठात हळद आणि तूप मिक्स करून केलेली पेस्ट किंवा कणीक हे बारीक केस काढण्यासाठी सर्वात जुने आणि प्रभावी उपायांपैकी एक आहे. ही कणीक त्वचेवर चोळल्याने बारीक केस आणि मृत त्वचा सहज निघून जाते. आठवड्यातून दोनदा वापरल्यास उत्तम परिणाम मिळतात.

बेसन आणि गुलाबपाणी

बेसन हा नैसर्गिक एक्सफोलिएटर असतो. गुलाबपाणी वापरल्यास केसांची वाढ मंदावते. दोन चमचे बेसन, दोन चमचे गुलाबपाणी आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावा आणि ती वाळल्यावर हाताने चोळून काढा. आठवड्यातून चार वेळा वापरल्यास केसांची वाढ कमी होते.

मध आणि साखर

साखर त्वचेचे एक्सफोलिएशन करते आणि मृत त्वचा काढते, तर मध सॉफ्ट शायनी करते. एक चमचा मध, दोन चमचे साखर आणि एक चमचा पाणी एकत्र करून ३० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. मिश्रण थंड झाल्यावर चेहऱ्यावर मसाज करा आणि वाळल्यानंतर अलगद काढा.

बटाट्याचा रस, हिरवे मूग पीठ आणि लिंबाचा रस

बटाट्याचा रस, लिंबू आणि मध हे तीन नैसर्गिक ब्लिचिंग एजंट मानले जातात. हिरवे मूगाचे पीठ केस काढण्यासाठी मदत करते. किसलेला बटाटा दाबून त्याचा रस काढा आणि त्यात हिरवे मूगाचे पीठ, लिंबाचा रस आणि मध मिक्स करून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून वाळल्यानंतर गोलाकारात चोळून काढा.

पपई आणि हळद

पपईमध्ये असलेला पपेन एन्झाइम केसांची मुळे कमजोर करतो आणि हळद त्वचेला चमक देते. पिकलेल्या पपईचे छोटे तुकडे करून पेस्ट बनवा आणि त्यात अर्धा चमचा हळद मिसळा. अप्पर लिप्सवर भागावर लावून काही मिनिटे मसाज करा. आठवड्यातून दोनदा वापरा. भारतीय घरांमध्ये पिढ्यानपिढ्या वापरले जाणारे हे देशी उपाय आजही तितकेच प्रभावी असून, रसायनयुक्त उत्पादनांपेक्षा जास्त सुरक्षित मानले जातात. या स्वस्त, नैसर्गिक आणि सहज उपलब्ध उपायांनी चेहऱ्यावरचे केस कमी करून त्वचेला नैसर्गिक सौंदर्य लाभते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ring Road : पुणेकरांची वाहतूककोंडीची कटकट संपणार! रिंग रोडच्या कामाला सुरूवात, वाचा कसा असेल मार्ग, किती वेळ वाचणार?

Visakha Subhedars Son: कुवेतमध्ये अडकलेला विशाखा सुभेदारचा मुलगा अखेर मुंबईत परतला; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

Homemade Facepack : चाळिशीनंतरही चेहरा दिसेल तरुण; लावा 'हा' फेसपॅक, तुमच्याच सौंदर्याचे होईल कौतुक

T20 World Cup final : वर्ल्डकप फायनलवेळी राडा, भारताची विकेट पडल्यामुळे वाद, १७ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

SCROLL FOR NEXT