Medicine Safety : मुदत संपलेली औषधं घेताय? आरोग्यासाठी ठरू शकतं अत्यंत धोकादायक

औषध खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासणे अत्यंत गरजेचे आहे, कारण मुदत संपलेली औषधे निरुपयोगी ठरण्यासोबतच आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात.
Medicine Safety
Medicine Safetysaam tv
Published On: 

औषध खरेदी करताना आपण नेहमी पॅकेटवर लिहिलेली एक्सपायरी डेट नक्कीच पाहतो, कारण ही तारीख निघून गेल्यानंतर साधारणपणे ते औषध आरोग्यासाठी सुरक्षित मानले जात नाही. अनेकदा अशी प्रकरणे समोर येतात जिथे एक्सपायरी झालेली औषधे खाल्ल्यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात. जेव्हा एखादे औषध एक्सपायर होते, तेव्हा केवळ त्याच्या परिणामकारकतेमध्ये घट होते असे नाही, तर ते आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. एक्सपायर्ड औषध खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो कारण अनेकदा त्याच्या रासायनिक रचनेत बदल होऊ शकतो.

अनेकदा लोक आरोग्याच्या समस्येमुळे वारंवार जावे लागू नये म्हणून आधीच औषधे गोळा स्टोअर करुन ठेवतात, पण असे करणे टाळले पाहिजे. औषधांची साठवणूक कशी केली जाते, यावरही त्यांची शेल्फ लाईफ किती असेल हे अवलंबून असते. जाणून घेऊया एक्सपायर्ड औषधे खाल्ल्याने कोणकोणते त्रास होऊ शकतात.

Medicine Safety
Colon Cancer : पाइल्स समजून दुर्लक्ष करू नका! 'ही' ६ लक्षणे कॅन्सरची असू शकतात; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

त्वचेची अ‍ॅलर्जी होऊ शकते

एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतर औषध खाल्ल्यास शरीरावर विविध प्रकारचे रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता वाढते. यामध्ये त्वचेवर अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसणे हा एक प्रकार आहे. यामुळे तुमच्या शरीरावर अनेक लहान-लहान पुटकुळ्या उठू शकतात, रॅशेस येऊ शकतात आणि त्वचेवर खाज किंवा जळजळ होऊ शकते.

काय होऊ शकतात गंभीर नुकसान?

एक्सपायरी डेट संपल्यानंतर औषधांच्या परिणामकारकतेची कंपन्या कोणतीही हमी देत नाहीत, परंतु याचा अर्थ असा मुळीच नाही की ती तात्काळ विष बनतात. तथापि, अनेकदा लक्षणे गंभीर असू शकतात. जसे की श्वास घेण्यास त्रास होणे, बेचैनी आणि घाबरल्यासारखे वाटणे. विशेषतः जर एखाद्याला आधीपासूनच श्वासोच्छ्वास आणि फुफ्फुसाशी संबंधित समस्या किंवा हृदयविकार यांसारख्या गंभीर समस्या असतील, तर हे खूप धोकादायक ठरू शकते. म्हणूनच कोणतेही औषध खरेदी करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट नक्की तपासली पाहिजे.

चुकीने एक्सपायर्ड औषध खाल्ले तर काय करावे?

जर तुम्ही चुकून अशी कोणतीही टॅबलेट, सिरप किंवा कॅप्सूल खाल्ली आणि तुम्हाला लगेच समजले, तर लक्षणांची वाट पाहण्याऐवजी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून संभाव्य धोक्यापासून बचाव करता येईल. तसेच, एखादे औषध घेतल्यावर अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास किंवा त्वचेवर अ‍ॅलर्जी यांसारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे योग्य ठरेल.

Medicine Safety
Breast Cancer Treatment: ब्रेस्ट कॅन्सरचा महिलांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? उपचारानंतरही जाणवतात या समस्या

शेल्फ लाईफ आणि एक्सपायरी डेट म्हणजे काय?

अनेकदा लोकांमध्ये शेल्फ लाईफ आणि एक्सपायरी डेटबाबत संभ्रम असतो. कोणत्याही औषधासाठी किंवा खाद्यपदार्थासाठी एक विशिष्ट तारीख असते, ज्यामध्ये उत्पादक हमी देतात की त्या तारखेपर्यंत ते उत्पादन किंवा औषध खाण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी राहील. शेल्फ लाईफबद्दल बोलायचे झाल्यास, ते कोणत्याही उत्पादनाच्या साठवणुकीवर अवलंबून असते की त्याचा प्रभाव आणि गुणवत्ता किती काळ टिकेल. उदा., काही औषधे केवळ विशिष्ट तापमानावरच ठेवणे सुरक्षित मानले जाते आणि अनेकदा औषधाचे सील उघडल्यानंतर त्याच्या वापरासाठीही एक निश्चित वेळ ठरलेली असते.

टीप: ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com