Clothes Cleaning Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Clothes Cleaning Tips : ड्रायक्लीन शिवाय सहज काढा कपड्यांवरील डाग, या ट्रिक्स फॉलो करा

Oil and Spice Stain : तेल आणि मसाल्याचे डाग येवढे हट्टी असतात की यांना साधारण निरमा पावडर आणि साबणाणे नाहीसे करणे अशक्य आहे.

कोमल दामुद्रे

How to remove stain in clothes : कित्येक वेळेस जेवण बनवत असताना किंवा जेवण करीत असताना कपड्यांवर तेलाचे आणि मसाल्यांचे डाग लागत असतात. ह्या डागांना निरमा पावडर आणि साबणाने काढणे शक्य नाही .अशा वेळेस तेलाचे डाग नाहीसे करण्यासाठी या टीप्स फॉलो करा.

कपड्यांवर डाग लागणे ही खूप साधी गोष्ट आहे. थोडासाही दुर्लक्षपणा कपड्यांना डागदार बनवतो. प्रत्येक वेळेस सर्वात जास्त डाग जेवण बनवताना किंवा जेवण करताना लागतात. तेल आणि मसाल्याचे (Spices) डाग हट्टी असतात की यांना साधारण निरमा पावडर आणि साबणाणे नाहीसे करणे अशक्य आहे.

तुमच्याकडे एकच उपाय असतो ड्राय क्लीन करणे. ड्रायक्लीन महागडे असल्यामुळे प्रत्येक जण याकडे दुर्लक्ष करत असतत .अशामध्ये डाग लागलेले कपडे घरात वापरण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. जाणून घेऊया कोणत्या ट्रिक्सचा वापर करता येईल

1. व्हिनेगरने करा चिकट डागापासून मुक्ती :

व्हिनेगरपासून ते तेलासारख्या चिकट डागांपासून सुटकारा मिळण्यासाठी एक छान घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एवढेच नाही तर यामुळे कपड्यांमधून दुर्गंध दूर निघून जाण्यासाठी फायदेशीर (Benefits) ठरते. व्हिनेगरने कपड्यांवर लागलेले तेलाचे डाग साफ करण्यासाठी डाग लागलेल्या भागाला व्हिनेगरमध्ये ओला करावा, कपडा रंगीत असेल तर व्हिनेगरला गरम पाण्यात (Water) बरोबर एकत्रित करून उपयोगात आणावे. भिजल्यानंतर डाग लागलेल्या भागाला थोडे घासावे डाग पूर्णपने नाहीसा झाला नसेल तर थोड्या प्रमानात तेथे व्हिनेगर सुद्धा लावू शकता.

2. बेकिंग सोडा आहे तेल ग्रीस डागांचा शत्रु :

असाधारणपणें प्रत्येक स्वयंपाक घरात मिळणारा बेकिंग सोडा कपडे साफ करण्यास सुद्धा उपयोगात येतो. बेकिंग सोडा हा तेलांच्या डागांचा शत्रु आहे. बेकिंग सोड्याने तेलाचे डाग घालवण्यासाठी थोड्याच प्रमाणात तेथे बेकींग सोडा लावायचा आहे. पण डाग हट्टी असेल तर बेकींग सोड्याचा रंगात बदल झाला की त्याला खरडून काढावे आणि पुन्हा तेथे बेकिंग सोडा लावावा .ही प्रक्रिया तो पर्यंत करत राहावे जो पर्यंत तेल पूर्ण कोरडे होत नाही आणि नंतर नेहमी सारखे कपडे धूवून ठेवावे.

3. लिंबूने साफ करा तेलाचे डाग :

लिंबू हा एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे. जो डाग हलका करण्यासाठी आणि कपड्यांपासून तेल काढण्यासाठी मदत करतो. नाहीसा करण्यासाठी लिंबूचा एक तुकडा कापा. आता लिंबूचा रस हळूहळू कपड्यांमध्ये मिक्स करा. आता कपड्यांना सुकू द्या, जर डाग जास्त चिवट असेल तर आणखीन लिंबू वापरा. त्यानंतर कपडे नेहमीसारखे धुवून काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT