World Parkinson's Disease Day Saam Tv
लाईफस्टाईल

World Parkinson’s Day: हालचाल मंदावतेय? पार्किन्सन्सची असू शकते सुरुवात, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त तज्ज्ञांनी या आजाराबद्दल जनजागृती वाढवण्याचं आवाहन केलं आहे. सुरुवातीची लक्षणं ओळखून वेळेवर उपचार घेतल्यास रुग्णाचं जीवन सुधारू शकतं. योग्य काळजी आणि उपचारांमुळे पार्किन्सन्स नियंत्रणात ठेवणे शक्य आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जगभरात आज जागतिक पार्किन्सन्स दिन पाळला जातो. तज्ज्ञ नेहमी पार्किन्सन्स या आजाराबद्दल जनजागृती वाढवण्याचं आवाहन करतात. लवकर निदान व्हावं आणि योग्य उपचार सर्वांना मिळावेत, यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितले. सध्या जगभरात १ कोटींहून अधिक लोक या आजाराने त्रस्त आहेत आणि हा मज्जासंस्थेतील वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक मानला जातो.

पार्किन्सन्स म्हणजे नेमकं काय?

पार्किन्सन्स हा मेंदूशी संबंधित दीर्घकालीन आजार आहे. या आजारात मेंदूमधील डोपामाइन तयार करणाऱ्या पेशी हळूहळू कमी होतात. त्यामुळे शरीराची हालचाल आणि समन्वय बिघडतो. या आजाराचं नेमकं कारण अजून स्पष्ट नाही, पण तज्ज्ञांच्या मते आनुवंशिक आणि पर्यावरणीय कारणांचा एकत्रित परिणाम यामागे असू शकतो. हा आजार प्रामुख्याने ६० वर्षांवरील लोकांमध्ये दिसतो, मात्र काही प्रकरणांमध्ये तरुणांनाही याचा सामना करावा लागतो.

लक्षणांकडे दुर्लक्ष होणं ही मोठी समस्या

पार्किन्सन्सच्या सुरुवातीची लक्षणं खूप सौम्य असतात. त्यामुळे अनेकदा ती साध्या वृद्धत्वाची लक्षणं समजून दुर्लक्षित केली जातात. हातपाय थरथरणं, हालचाल मंदावणं, स्नायूंमध्ये समस्या, चालताना तोल जाणे किंवा पाय जणू गोठल्यासारखे वाटणं ही काही सामान्य लक्षणं आहेत.

या आजारात केवळ शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम होतो. डिप्रेशन, चिंता, झोप न लागणे, लक्ष कमी होणं, वास ओळखण्याची क्षमता कमी होणं आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या देखील दिसून येतात. अनेकदा ही लक्षणं शारीरिक लक्षणांपूर्वीच दिसतात, त्यामुळे वेळेवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे.

वेळेवर उपचार करणं गरजेचं

तज्ज्ञांच्या मते, पार्किन्सन्स हा पूर्णपणे बरा होणारा आजार नसला तरी योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास तो नियंत्रणात ठेवता येतो. औषधांसोबतच फिजिओथेरपी, नियमित व्यायाम आणि काही उपचार पद्धतींमुळे रुग्णांचं जीवन सुधारतं. डीप ब्रेन स्टिम्युलेशन (DBS) सारख्या उपचारांमुळे अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील डॉ. गुरनीत सिंग साहनी यांनी सांगितलं की, वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास रुग्ण आपले दैनंदिन जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतात. योग्य काळजी घेतल्यास हा आजार नियंत्रणात ठेवणे शक्य आहे.

वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

पार्किन्सन्सची लक्षणं दिसू लागल्यास विलंब न करता न्यूरोलॉजिस्ट किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन करण्यात आलंय. लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे रुग्णांचे आयुष्य अधिक चांगलं होतं, असं तज्त्रांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात मारले अन् बीडमध्ये अंत्यविधीला नेलं, आईनेच घेतला पोटच्या लेकराचा जीव, धक्कादायक कारण समोर

Shocking : संतापजनक! ९वीच्या विद्यार्थिनीवर ४ महिने १० जणांनी केला बलात्कार

Maharashtra News Live Update: भिवंडी नगरसेवक व पालिका अधिकारी यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर पालिकेकडून बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई

महाराष्ट्रात भूकंप होणार, महिनाभरात ठाकरेंचे आमदार-खासदार फुटणार, मंत्र्यांच्या दाव्यानं खळबळ

सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत

SCROLL FOR NEXT