Ear Pain Home Remedies : तुमचा कान दुखतोय? कानाला सतत खाज येतेय? ही एक सामान्य समस्या आहे. काही कारणांमुळे आपल्या कानात संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला यावेळी भयंकर वेदना देखील होऊ शकतात.
कान हा शरीराचा एक नाजूक भाग आहे आणि खाज सुटणे किंवा दुखणे यापासून आराम मिळवण्यासाठी कानाला कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे आपल्याला महागात पडू शकते.
कानात खाज येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्या व्यक्तीमध्ये अतिसंवेदनशील न्यूरोलॉजिकल फायबरची उपस्थिती. या लहान तंतूंमुळे कानांच्या आत संवेदनशीलता निर्माण होते, ज्यामुळे वारंवार खाज सुटते. कानाच्या त्वचेचा कोरडेपणा, ज्यामुळे खाज सुटणे आणि वेदना होऊ शकतात.
कानात वेदना (Pain), खाज सुटणे किंवा सूज यावर काय उपचार आहे? लक्षात ठेवा तुम्हाला कानात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा. परंतु, काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे कानदुखी आणि इतर समस्यांपासून आराम मिळू शकतो.
१. कानाला खाज येत असेल तर आपण कोरफड जेलचे काही थेंब कानात घालू शकतात. कोरफड कानाच्या आतील भागाची पीएच पातळी सुधारते. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म कोरडे, खाज येणे, कानाची चुळचुळ थांबवते
२. आल्यामध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे कानदुखीपासून मुक्त होण्यास फायदेशीर ठरू शकतात आणि कानाला खाज सुटण्यास देखील आराम देऊ शकतात. आल्याचा रस लावा गरम करून गाळून तेलात घाला. हे मिश्रण बाह्य कानाच्याभोवती लावल्यास आराम मिळेल.
३. खोबरेल तेल, वनस्पती तेल, ऑलिव्ह तेल आणि पातळ केलेले चहाच्या झाडाचे तेलाचा वापर आपण कान दुखीच्या समस्येवर वापरु शकतो. हे तेल कानात काही वेळ घालून ठेवा. तेलाचे बाष्पीभवन होऊ देण्यासाठी आपले डोके मागे सरळ करा आणि अतिरिक्त तेल पुसून टाका.
४. लसूण केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर शतकानुशतके या औषधी वनस्पतीचा उपयोग प्रतिजैविक आणि वेदनाशामक म्हणून केला जात आहे. ठेचलेला लसूण गरम ऑलिव्ह किंवा तिळाच्या तेलात भिजवा. लसूण गाळून त्याचे काही थेंब कानात घाला. कानाची खाज थांबवण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.