Which e-bike is high speed : सध्या भारतात वाहन उद्योग क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यात ग्राहकांकडून मिळणाऱ्या पसंतीस लक्षात घेऊन अनेक मोठ-मोठ्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात वाढ करत आहेत.
त्यातही बाईक्सच्या विभागात पहायला गेलो तर अनेक इलेक्ट्रॉनीक बाईक्स (Bikes) मॉडेल्स लाँच करण्यात आले असून त्यातील काही मॉडेल्स इंजिन बाईक्सपेक्षा चांगल्या असल्याचे दिसून येते. कोणत्या साध्या बाईक्सपेक्षा उत्तम ठरतात इ-बाईक्स, जाणून घ्या सविस्तर.
अल्ट्रावॉयलेट एफ77
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात बंगलोर मधील स्टार्टअप (Startup) अल्ट्रावॉयलेटकडून 'एफ77' बाईक लाँच करण्यात आली होती. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये ७.१KWhची बॅटरी आणि २७KW क्षमतेची मोटार दिली जाते. ज्यामुळे ही बाईक फक्त २.९ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति तास अंतर पार करू शकते. या बाईकचा सर्वाधिक वेग १५२ किलोमीटर प्रति तास आहे. या इलेक्ट्रिक बाईकची किंमत ३.८० लाखांपासून सुरू होते.
टार्क क्राटोस आर
टार्ककडून या 'क्राटोस' इलेक्ट्रिक बाईकला लाँच करण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक (Electric) बाईक ० ते ४० किलोमीटरचे अंतर फक्त ३.५ सेकंदात पार करते. यामध्ये ४KWhची बॅटरी आणि मिड ड्राइव्ह मोटर देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक बाईकचा सर्वाधिक वेग प्रति तास १०५ किलोमीटर आहे. या बाईकची किंमत २.०९ लाख रुपये आहे.
ओबेन रोर
ओबेन रोर इलेक्ट्रिक्सकडून 'रोर' ही इलेक्ट्रिक बाईक लाँच केली गेली आहे. याची शोरुम किंमत १.५० लाख रुपये आहे. ही इलेक्ट्रिक बाईक फक्त ३ सेकंदात ० ते ४० किलोमीटर अंतर पारक करते. या बाईकचा सर्वाधिक वेग १०० किलोमीटर प्रति तास आहे. त्याचबरोबर या बाईकमध्ये ८KW च्या मोटारी सोबत ४.४KWhची बॅटरी देण्यात आली आहे.
होप ऑक्सो
होप इलेक्ट्रिककडून ही 'ऑक्सो' बाईक लाँच करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक बाईकची किंमत १.४८ लाख इतकी आहे. या बाईकचा सर्वाधिक वेग ८८ किलोमीटर प्रति तास असून तुम्ही फक्त ५ सेकंदात ० ते ४० किलोमीटरचे अंतर पार करू शकता. या बाईकला ३.७५KWh बॅटरी देण्यात आली आहे.
कबीरा मोबिलीटी
कबीरा मोबिलिटीकडून 'केएम ४०००' ही इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्यात आली आहे. या बाईकचा सर्वाधिक वेग १२० किलोमीटर प्रति तास आहे. या बाईकने तुम्ही फक्त ३.२ सेकंदात ० ते १०० किलोमीटरपर्यंतचे अंतर पार करू शकता. या बाईकला ४.६० KWhच्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.