Sankasht Chaturthi 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Sankasht Chaturthi 2024 : माघ महिन्यातील द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीला करा उपाय, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Sankashti Chaturthi 2024 In February : संकष्टी चतुर्थी हा हिंदू पंचागातील महत्त्वाचा व्रत आहे. ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. यंदा माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही २८ फेब्रुवारीला आली आहे.

कोमल दामुद्रे

February Sankashti Chaturthi Date:

संकष्टी चतुर्थी हा हिंदू पंचागातील महत्त्वाचा व्रत आहे. ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. यंदा माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही २८ फेब्रुवारीला आली आहे.

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात श्रीगणेशाला पूजनीय मानले जाते. बाप्पा हा विघ्नहर्ता असून तो अनेक संकट दूर करतो. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीची (Sankashti Chaturthi) तिथी, पूजा आणि पद्धत

1. संकष्ट चतुर्थी तिथी

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला यंदा संकष्टी चतुर्थी आली असून तिला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते. पंचागानुसार २८ फेब्रुवारीला पहाटे १ वाजून ५३ मिनिटांनी सुरु होईल तर ९ वाजून ४६ मिनिटांनी समाप्त होईल.

2. द्विजप्रिया संकष्ट चतुर्थीचे महत्त्व

माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी असेही म्हणतात. या दिवशी गणपतीच्या ३२ रुपांपैकी सहावे रुप आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीचे शौदाशोपचार पद्घतीने पूजा केली जाते. या दिवशी मनोभावे पूजा केल्याने गणपतीचा आशिर्वाद मिळतो असे म्हटले जाते.

3. पूजा पद्धत

  • या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर जागरण करुन गणपती बाप्पाचे ध्यान करा.

  • मंदिराची स्वच्छता करा आणि नंतर श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करा.

  • त्यानंतर पंचामृत, अक्षता, सिंदूर, पान अर्पण करा

  • दीप प्रज्वलित करुन व्रत आणि आरती करा

  • तसेच पूजा करताना गणेश (Ganpati) मंत्राचा जप करा.

  • गणपतीला लाडू अर्पण करा. तसेच श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करा. जर तुम्ही उपवास करत असाल तर तामसिक अन्नपदार्थाचे (Food) सेवन करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

SCROLL FOR NEXT