Dussehra 2024 Wishes Saam TV
लाईफस्टाईल

Dussehra 2024 Wishes : दसऱ्यानिमित्त नातेवाईकांसह मित्रमैत्रीणींना द्या या खास शुभेच्छा; वाचा संपूर्ण यादी

Ruchika Jadhav

हिंदू धर्मात पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा असं म्हटलं जातं. हिंदू धर्मातील विविध सण उत्सवातील दसरा हा एक महत्वाचा सण आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर व्यक्ती घरात विविध वस्तूंची खरेदी देखील करतात. विजयाचं प्रतिक म्हणून साजरा केला जाणारा हा सण यंदा १२ ऑक्टोबर रोजी आहे.

भारतात सण उत्सव म्हटलं की प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देतात. पूर्वी घरोघरी जाऊन शुभेच्छा दिल्या जात होत्या. मात्र आता व्यक्ती कामात इतके व्यस्त असतात की, त्यामुळे घरोघरी न जाता सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी दसऱ्याच्या शुभेच्छांची सुंदर यादी आणली आहे.

  • झालेल्या चुका या निमिनत्ताने विसरा; वाटून प्रेम एकमेकांना साजरा करु दसरा! सर्वांना शुभ दसऱ्याच्या शुभेच्छा.

  • दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने, या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याच्या सोन्याचे पान! विजयदशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

  • समृद्धीचे दारी तोरण, आनंदाचा दसरा सण, सोने लुटून हे शिलगण, हर्षानं उजळू द्या अंगण; सर्वांना HAPPY Dussehra

  • आव्हानांच्या सीमा ओलांडून गाठू यशाचे शिखर! प्रगतीचे लुटू सोने अन् सर्वांमध्ये वाटू शुभ शुभेच्छा!

  • सोनेरी दिवस, सोनेरी पर्व; सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी; सोन्यासारख्या लोकांना सोनेरी दिवसाच्या सोनेरी मंगलमय शुभेच्छा!

  • लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा,हाती घेऊनी नवी उमेद, नवी आशा; होतील पूर्ण मनातील इच्छा, दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा!

  • झेंडुची फुले, आपट्याची पाने

घेवूनी आली विजयादशमी

दसऱ्याच्या आज शुभ दिनी

सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी

दसऱ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा!

  • तांबडं फुटलं,

उगवला दिन,

सोन्यानी सजला,

दसऱ्याचा दिन!

  • निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला

सोन्याचा मान तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  • जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभाव

सोने लुटूया प्रगत विचारांचे..

करुन सिमोल्लंघन,

साधूया लक्ष विकासाचे…

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • आंब्याच्या पानांची केली कमान,

अंगणात काढली रांगोळी छान,

आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,

आपट्याची पाने देऊन करा साजरा..

दसरा व विजयादशमीच्या

हार्दिक शुभेच्छा!"

  • "आपट्याच्या पानांची

होते देवाणघेवाण..

प्रेमाचा ओलावा

करुनि दान..

शुभ दसरा..!"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitthal Mandir : तिरुपती, अयोध्यानुसार पंढरपुरात टोकन दर्शन सुविधा; कार्तिकीनिमित्ताने ४ नोव्हेंबरपासून चोवीसतास दर्शन

Sayali Sanjeev: अप्रतिम असं मनमोहक सौंदर्य, पाहून घायाळ व्हाल

Diwali 2024 : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला झाडू का पुजतात?

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; मारेकऱ्यांचे पुणे कनेक्शन, आरोपी करायचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय

Munmun Dutta: तारक मेहता फेम मुनमुन दत्ताचा ग्लॅमरस अवतार, नव्या फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT